Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

लेखांक ३१.

श्री.

१६१७.

''दसकत बेस्मी बालोजी बीन हरजी रेणुसा मोकदम मौजे पाबे इनामती देसमुख तर्फ कानदखोरें सु॥ सीत तिसैन व अलफ कतबा लिहून दिल्हा ऐसाजे. - मौजे मजकुरीची गांवजात्रेंफळीं व रानसावजाची फळी देखील डुकराचे कुले व विववा देसमुखी सालाबाद भोगवटा खादला असोन, आपण दरम्यान इस्कील केली होती. ह्मणून साहेबीं हुजूर आणून, देशमुखाचे गुजारतीनें गुन्हा शाबीत करून, गुन्हेगारी दंड रुपये ३५ पचतीस करून वसूल घेतला; आणि रजा फर्माविली कीं, इतकियाउपरी देसमुखांचा जो भोगवटा सालाबाद आहे, तेणेंप्रमाणें देसमुख मशारनिलेचे दुमाले केले असोन, तुवा हरकत केली. ह्मणून तुज गुन्हेगारि घेतली. तरी येथून पुढें गांवजात्रेची फळी व रानसावजाची फळी व डुकराची विवा देखील फळें देसमुखास देत जाणें. हरकत इस्कील करिसील ह्मणिजे तुझा उबार राहणार नाही. ह्मणून हुकूम केला. तरी आपण गावजत्रेची फळी व रानसावजाची फळी व डुकराची विवा देखील फळें देसमुखास देईन. यास एकजरा इस्किल हरकत फितवा करीन तरी दिवाणाचा गुन्हेगार साहेब जे शास्त अथवा गुन्हेगारी घेतील, ते आपण कबूल असे. गांवीची संचणी लावणी करीन व मागें तीन वरसें फळी खादली आहेत, त्याची समजावीस देसमुखाचे पाय धरून करीन. हा कतबा सही * ''