Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)

लेखांक १०

श्री                                                        १६०६ पौष शुध्द १०

छत्रपती + + +

स्वस्ति श्रीराज्या + + + + + + + + रक्ताक्षीनामसवत्सरे + + + + + दसमी बुधवासरे साक्षपत्र हाजीर मजालसी स्थळ किल्ले रायगड

हबीरराऊ मोहिते सेनापती

10 1

सिदोजी बिन तुकोजी पाटील पोळ मोजे
कविठे पा। वाल्हे अर्जनीस हुजराती
(निशाणी नांगराची)

शेसो बापूजी देसकुळकर्णी सेकोजी बिन मतनोजी काळे देसाई
किले सातारा निविस्ते वस्टमालकर का। कोळे
बिलालराऊ (निशाणी नांगराची)
अबाजी बिन धारोजी अताजी लक्षुमण दि॥ सबनिसी
जाधव पाटील मौजे लस्करी हुजराती
परिंचे पा। पुणे
(निशाणी नांगराची)
 
माऊजी बिन चादजी केदारजी जाधव पाटील मौजे
सोनवणी पटेल मौजे + + + पाचुद पा। कर्‍हाड
पा। पुण्हे (निशाणी नांगराची)
लिगोजी पाटील कालगे  
मौजे वर्जे पा। कर्‍हाड  
(निशाणी नांगराची)  

शालवान शक १६०६ या विदमाने सटवोजी बिन बाबाजी भोसले यानी लेहून दिल्हे साक्षपत्र ऐसे जे माहादजी बिन सुलतानजी पाटील का। मसूर याच्या बापभावाचा गाऊ मौजे सिरवडे ता। उबरज त्या गावामधे आपण सेते केली होती व मिरासीची सेते पटेलमजकुराची घेतली होती व पटेलगीस कटकट केली होती त्याबद्दल माहादजी पाटलामधे वा आम्हामधे कुसूर पडोन मौजे कोणेगावामधें माहादजी पाटिलावरी आपण चालोन जाऊन गदर केली त्याकरिता माहादजी पाटील हुजूर एउनु राजश्री साहेबापासि वर्तमान विदित केले की त्यावरून साहेबी आपणास हुजूर बोलाउनु आणून वाजीपुसी केली आणि राजश्री कविकलश छदोगामात्य व राजश्री सरकारकून ऐसे सदरेस बसोन वर हक्क मुनसफी केली तेथे निर्वाह जाहाला ऐसा जे माहादजी पाटील का। मजकूर यावरी आपण गदर केली ते निरर्थक केली त्याचे सेताचा आपण आवारा केला व त्याची वैरणी काडी नेली व त्याची माळीची लाकडे आपण केली व त्याची विसाती अगावरील नेली ह्मणाउन माहादजी पाटिलाने हुजूर विदित केले तरी आपल्यापासि तरवार १ व कोचकी १ व सेला १ ऐसे आहे ते आपण देतो वरकड माहालीच्या कारकुनाच्या विदमाने साक्षपत्र लेहून येईल ते आपण देऊन व सिरवडे तेथील पाटिलकीसि व त्याच्या सेतासि आपण कथळा नसता च केला होता तेथे पेस्तर कथळा कराव्या गरज नाही ऐसा निवाडा जाहाला याउपरि आपण जरी पेस्तर तेथील पटेलगीचा अथवा सेताभाताचा व माहादजी पाटिलासि कथळा करून तरी दिवाणीचा गुन्हेगार व गोताचा अन्याई त्यास आपण अर्थे अर्थ समध नाही हे आपले वडिलाचे इमान सही साक्षपत्र पत्र सही सही *

तेरीख ५ रबिलोवल
सु॥ खमस समानीन अलफ