Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)

सु॥ सलास समानीन अलफ कारणे जाहाला मजहर ऐसा जे सताजी बिन भिवजी चव्हाण पाटील मौजे कोणेगाऊ व माहादजी बिन सुलतानजी पटेल जगदळे का। मसूर हरदू जण राजमुद्रा व देसक व गोत या पासी एऊनु उभे राहिले आणि सताजी बिन भिवजी चव्हाण पटेल मौजे कोणेगाऊ बोलिला की आपण कोणे-गावीचा पटेल मिरासदार पिढी दरपिढी वडील नागराचा धणी आहे ऐसीयास गावीचे पटेलगीचे बयान गाव आज रकम

मशाती जमीन चावर १२  १४

गैर मो॥ ठिकणे ६

ऐसीयास पटेलगीस तकसीमा ३

आपण वडील                                       मालोजी व बाळोजी पाटील
आपणास तकसीम                                हसीली तकसीम
चावर               ठि॥ वरिले                    चावर ४
१४             ६                                फहिरोजी व नरसोजी
पान मान माहार नागर तश्रीफ                हसीली तकसीम
वडीलपण आपलें                                  चावर

एणेप्रमाणे तकसिमा आहेत पैकी वजा बापभाऊ तकसीमदार २ ए॥ चावर ८ बाकी आपणास खाशाखाली उरले

जमीन चावर ठी॥ पान मान तश्रीफ माहार
१४ ६ नागर वडीलपण कलम १

एणे प्रमाणे आपली वृत्ति आहे ऐसीयास या पैकी वजा देसकुलकरणी पा। मा। यास तिसरी तकसीम दिली

जमीन             ठी॥ गैरमो।
१।१४                    २

बाकी आपणा खाली उरले आहे
जमीन चावर ठी। गैरमो।                       वडीलपण पान मान महार

२॥।                      ४                           नागल कलम १

एणे प्रमाणे आपल्या खाशा खाली उरले आहे यास आपला चुलता विठोजी पाटील पटेलगी वडीलपण करीत होता तो मरोन गेला त्याचा लेक तोही दुकाळामधे मरोनु गेला आपण एकटाच उरलो आपणास खावयास नाही सेतभात करून पाढरी वरी असावे तरी बैलढोर नाही या करिता नाही उन्नादरका विणे सुजोनु फुगोनु मरो लागलो आपले तकसीमदार बापभाऊ आहेत त्यास ही आपण हटकिले ते ही आपणास काहीं अनकूह होतीना निराश्री जाहालो मग जरूर शरीररक्षणार्थ उपाये केला पाहिजे ह्मणऊनु माहादजी पटेल जगदळे का। मसूर हे थोर नाईक आहेत त्याचे मुळे आपले शरीररक्षण होईल ह्मणउनु का। मसुरास जाऊनु माहादजी पाटिलाची भेटी घेतली व आपले वर्तमान सागितले परतु त्यानी मन घातले नाही आपण कार्यवादी आपलिया कार्यानिमित्त जरूर त्याचे अनुवर्जन करावे लागले ऐसियास सातपाच येरझारा केल्या या वरून माहादजी पाटील मसूरकर यास भार जाहाला मग बोलिले की तुझे पटेलगी विणे आपणास गरज नाही तू जरूर गळा पडतापेस तरी तुझा काय मफसूद तो सागणे मग आपण बोलिलो की आपला चुलता विठोजी पाटील पाटीलगली करीत होता तो मेला त्याचा लेकही मेला आपला बापही मेला आपणास आधार नाही व खावयास नाही काळ कठीण पडिला आपण नेणता आपणास अन्न देऊनु रक्षणे आपली सदरहू मिरासी पैकी चावर एक १ एकाची पटेलगी खाशाखाली ठेऊनु उरले जमीन चावर

चावर                ठी॥               वडीलपण
१॥।                    ४                कलम १ो