Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)

त्याउपरी बापाजी मुसलमान पश्चम वादी याने तकरीर केली ऐसी जे आपले बडे सवगिरी करीत होते त्याचा देवघेव मसुरी होता रयतावरी कर्जवाम होते त्यास आपला बाप याकुबजी हा मागत होता ते मागो नको ह्मणऊन आपल्या बापास दटाऊ बाहेर घातले व मसूरचे पीरजादे याचे घरी आपल्या बड्याची बेटी दिल्ही होती तिचे दोघे बेटे व तिचा मर्द नरसोजीचा बाप कुमाजी याने जिवे मारिले मग आपला बाप कर्‍हाडास जावून अबदल्ल हुसेन नैब यास सागितले त्यानी तलप केली कुमाजीस धरून नेले आणि त्यास नागवण बाधिली आणि जमान देऊन पळोन गेला मग आपल्या बापाने आपले आफळादीचे खुन जाहले ह्मणऊन दिवाणात पैके कबूल करून पटेलगी सोडवीली व आपले गाव निसबतीचे देणेही देऊ दिल्हे नाही ऐसे पैके आपले द्यावे व आपल्या खुनाचा जाब करावा ऐसे हिसाबी किताबी आसता धिगायी करून थलोथल हिडवितो तरी तुह्मी गोत माय बाप आहा आपले देणे रास्तिक आहे व आपला खूनही रास्तिक आहे तुमचे थल थोर आहे धर्मता निवाडाला कराल ह्मणऊन हे स्थल मागोन घेतले हिंदू अगर मुसलमान ऐस न ह्मणावे वर हक निवडा कराल त्यास आपण राजी असे ऐसी तकरीर लेहून दिल्ही याउपरी धर्माधिकारी यानी निश्चय केला की साक्ष कागदपत्र पाहावे मग जगदियाळापासील कागद पाहिजे तपसील आबरखानाने निवाडा केला तेथेही जगदलियाची देशमुखी व पटेलगी करार करून मुसलमान दूर केला व कर्‍हाडी हि बापाजी मुसलमान दूर जाहाला ऐसी थलपत्रे मनासी आणिली बहुता दिवासाचे वतन देशमुखी व पटेलगी जगदले याची पुरातन कदिम फमानी जगदेव-राव जगदाळा ब्राह्मण कर्‍हाडीचा देसायी यामध्ये व मसूरकर यामध्ये वतनदारीचा कथळा होता त्याच्या निवाड्याचे फर्मान होते ते मनास आणिता कदीम देशमुखी पटेलगी जगदाले याची याउपरी बापाजी मुसलमान बोलला की पिर जलालदीन हा पहिले हिदु होता त्याचेच आपण होतो या करिता आपली मुजावरकी होती ऐसे असता आपला खून केला त्यावरी नरसोजी जगदाळा बोलला की आपला बाप व आपला चुलता काय निमित्त्य मारिला ऐसे गोताने विचारावे मग गोताने बापाजीस विचारले की जगदळीयाचे खून मुजावरनी काय निमित्य केले त्यावरी बापाजी बोलला की मुजावराचे वतन हिरोन घेतले याबद्दल मुजावरानी दोनी केले

जगदाली यानी मुजावर तिघेजण मारिले बेबुन्याद केली जाजति आपला एक खून द्यावा आणि आपले देणे द्यावे ऐसे नाही ह्मणेल तरी दिव्य करावे याउपरी बापाजीस धर्माधिकारी यानी विचारिले की तुझे देणे कोणी गाव निसबतीने देणे दिल्हे तेव्हा कुमाजीस पुसोन दिल्हे असेल तरी तुजपासी काही कागदपत्रक तबे असतील - ते दाखवणे तुझे काय देणे असेल ते देववू परस्परे तुवा लोकास कर्ज दिल्हे गैर-हगामी मारामारी करू लागलास ह्मणून तुज ताकीद करून सागितले त्याकरिता तू गळा पडोन थळास नरसोजी जगदळे यासी आणिले आणि आपला खुन द्यावा ह्मणतोसी तरी मुजावरानी जगदळे याचे निरपराधे दोनी खून केले एकएका खुनास आकरा आकरा खून द्यावे