Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
बाकी विकिले किंमत होनु २० यास खडून दिल्हे खत कर्दे महादजी बिन सुलतानजी पटेल जगदळे का। मसूर
मशाजी जमीन | ठिकणे गैरमो। | वडीलपण पानमान |
चावर | वसले | तश्रीफ माहार नागर |
१॥। | ४ | कलम १ |
एणे प्रमाणे माहादजी पाटील याने खत केले असे सदरहू जमीन व वडीलपण याचा धणी पटेल माहादजी बिन सुलतानजी जगदळे का। मसूरकर असे आता सताजी बिन भिवजी चव्हाण पटेल मौजे कोणेगाऊ व मादजी बिन सुलतानजी जगदळे मसूरकर या हरदुजणानी समाजुगतीने असावे मादजी बिन सुलतानजी पटेल जगदळे मसूरकर यानी सदरहूचे हक खाऊनु वडीलपण दिवाण-चाकरी करावी सताजी बिन भिवजी याने एक चावराची हसली तकसीम खाऊनु सुखी असावे वडीलपण पानमान तश्रीफ माहार नागर सताजी भिवजीस अर्थे अर्थ समध नाही हा महजर सही
खासा रुद्राजीपण देसकुळकर्णी यासि दिल्हे जमीन चावर ॥१४ वगैरे मोइनी ठिकाणे २ दोनी त्या पासून फिराऊन मागोन घेतले त्यास घोडा एक बापूजी सलाबतखानियापासून घेऊन सारगा घोडा किमती होन १५० दीडसेयाचा कागदर रुद्राजीपताच्या दस्तुरे आलाहिदा असे
राजश्री कोनेर रगनाथ सरसुभेदार यास हरकी बा। होन १०० सेभर दिल्हेयाचे अलाहिदे जाब आहेती देसमुख व सरदेसमुख होन पनास व देसकुळकर्णी होन पचवीस या खेरीज गावकरीयास व परगणियाच्या पाटिलास तश्रिफा दिल्ह्या होन सेभर एणे प्रमाणे माहाजर जाहाला सताजी चव्हाण पाटील याकडे चावर एक राहिला तो हि चावर आणीक तीस होन घेऊन घेतला या खेरीज त्याचा पोटखर्च जाहाला असे एणे प्रमाणे माहाजर जाहाला सही