Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ८
१५४३ माघ वद्य २
अज रख्तखाने राजश्री अबाजी राजे घाटगे दामदौलतहू बजानबे कारकुनान्ये व मोकदमानी ता। मसूर बिदानद सु॥ सन इहिदे सलासीन अलफ बदल इनाम मौजे शहापूर तानाजी जदगळे देसमुख ता। मजकूर व पटेल का। मजकूर यानी येऊन हुजून मालूम केले की, आपली देसमुखीचा इनाम मौजे शाहापूर सालाबाद चालत असता दरम्याने माहालीच्या कारकुनानी अमानत केले, आपण मिरासदार, आपल्यावरी मेहेरबान होऊन मौजेमजकूर आपले दुमाले करविले पाहिजे, ह्मणजे आपण कुल गावगन्ना फिरोन लावणीसचणी करून ह्मणऊन अर्ज केला बराई अर्ज खातरेसी आणून मौजेमजकूर देसमुखास कुलकानू कुलबाब इनाम दिला असे तेथे कोणी दखलगिरी करावयासी गरज नाही देसमुख मजकुरापासी हरकी होन २०० दोनीसे घेऊन इनामतीचा गाऊ दुमाले केले असे तेथे कोण्ही बिलाहरकती करावयासी गरज नाही दर साला ताजा खुद्द खता उजूर न कीजे तालीक लेहून घेऊन अस्सल खुदा देसमुखापासी परतोन दीजे पा। हुजूर रा। गोपाळपडित
तेरीख १५ रबिलावल
पो छ २८ रबिलोवल आवर्दे अबाजी कृष्ण
अफराद ठाणे ता। मजकूर