Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ७
१५४२ भाद्रपद वद्य १
कौलनामा अज दिवापण ठाणा तपे मसूर ता। नरसोजी जगदळे देसमुख व पटेल कसबेमजकूर अज पुजा श्री सरस्वती सु॥ इहिदे असरीन अलफ कारणे दिला कौलनामा ऐसा जे बापाजी मुसनमान याने हिमातीच्या बले दरम्यान कथळा करून कसबेमजकुराचे पटेलगीस दखल जाहला यावरून तुह्मी हुजूर जाऊन दिवाण आला मलिकइनीस साहेब हुजूर याचे खिजमतीस उभे राहून आपली कुल कैफती दखल करून बापाजी मुसलमान यासी हुजरून तलब करून हुजून नेला कुल हक जवारी माहाल दर माहाल याचे गोहीसाक्षीनसी बापाजी मुसुलमान दूर जाहाला हुजरून तुह्मास कौल मर्हामत करून तुमची पटेलगी तुमचे दुमाला करविली व तपेमजकुरीची देसमुखीचा कारभार तुमचे हातून घेत जाणे ऐसा हुकूम ठाणियास हुजरून खुदखत सादर जाहाले तपेमजकुरीची देसमुख व कसबेमजकुरीची पटेलगी जगदळियाची गोहीशाक्षी मोझा मोकाबला रुजू करून दुमाला केली असे बरहुकूम खुद खत कसबेमजकुरीची पटेलगी व तपेमजकुरीची देसमुखी दुमाला केली असे बापाजी मुसुलमान यासी दखलगिरी करावयास गरज नाही कसबेमजकुरी पटेलगी पिढी दर पिढी चालत आली आहे तैसे चालऊन आपला खातीरजमा राखोन देसमुखीचा कारभार करून अमलप्रमाणे आपला हकलाजिमा खाऊन कीर्दी माहमुरी करून शक न धरिता आपले वतन चालविणे दरी बाब कौल असे
तेरीख छ १४ माहे सौवल
हा। खुद खत पा। हुजूर
जैदी माहालदार