Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)

तेही न करिता जगदळे यानी तीन खून घेतले ऐसे धर्माधिकारी बोलले त्यावरि बापाजी मुसलमान बोलला जे आपले पैके गाव-निसबतीने यावे होते कुमाजीस धरून आणिले तेव्हा जे गाव-निसबतीने पैके राहिले असतील ते द्यावे ऐसा नेम करून कागद लेहून दिल्हा आहे त्याउपरी नरसोजी जगदाळा बोलला की माराच्या भ्याने आपल्या बापाने काय कागद दिल्हे असतील ते आपणास ठाऊके नाहीत तीन वरसे आपला बाप बदखानी होता ते समई नेबाचि पाठी करून सारा गाव नागविला ऐसे असता याचे काय देणे असेल ते रुजू करून दिल्हे ह्मणजे आपण देईन उगाच झोडाई करून गळा पडतो त्या उपरी बापाजी मुसलमान बोलला की आपण झोडाई करून गळा पडतो ह्मणतोस तरी दिव्य करणे तेथे खरा जाहलास ह्मणजे तुज व आपणास समध नाही ऐसे बोलिला त्यावरी धर्माधिकारी यानी निश्चय केला की गोही साक्ष कागद-पत्र असता दिव्य कैसे द्यावे मग सभानायकी नेम केला की थोर ग्रथ विज्ञाने-स्वर आहे तेथे पाहून निवाडा करावा मग धर्माधिकारीणीयानी विज्ञानेश्वर ग्रथ आणून पाहाता तेथे निघाले की साक्ष असता गोही असता उगेच एकाचे गळा पडेल त्यास देहात प्रायश्चित्त असे यदर्थी ग्रथीचा श्लोक ॥ यद्योकोमानुषी ब्रुयात्त दन्त्यो ब्रुयास्तदैव की ॥ मानुषी तत्र गृण्हि यान तुदैवी क्रिया नृप ॥१॥ रातेपत्रे मृते साक्षे देशाश्च प्रलयतत ॥ त्रिभि स्तत्र न विद्यते चतुर्थ दिव्य साधन ॥२॥ यावरुन जरी दिव्य द्यावे ऐसे कोण्हास हि नउमजे साक्ष उपसाक्ष असता कागद-पत्र असता गळा पडोन तुवाच नरसोजी जगदाळे याचाप बाप धरून नेऊन नागवण बाधिली आणि वतनासही भ्रष्ट केला आणि आता झोडपणे नरसोजी जगदले याचे गला पडोन त्यास कष्टी केले वतनास विक्षेप केला ऐसा तू गुन्हेगार तुज देहात प्रायश्चित्त द्यावे परतु मुसलमानाची पादशाही आणि तूही मुसलमान याकरिता क्षमा जाली मग नरसोजी जगदाळा बोलला की शास्त्री अन्यत्र ग्रथी बोलाव-यास समध नाही मग धर्माधिकारिणी यान्ही बापाजी मुसलमान यास आज्ञा केली की तुझा निवाडा जाहला तू खोटा जाहालास नरसोजी जगदाला खरा जाहला तू आपले येजीतपत्र लेहोन देणे मग बापाजी मुसलमाने नरसोजी जगदळा यासी यजीतपत्र लेहोन दिल्हे की मसूरचे पटेलगीसी आपणास बोलावयासी समध नाही व आपले देणे व खुनाचे लिगाड तुह्मासी काही नाही इतकियाउपरी तुह्मासी कथळा करून तरी दिवाणचे खोटे गोताचे अन्याई ऐसे यजित-पत्र खाने अजम दावळखान याचे हुजूर लिहून दिल्हे ऐसे जय-पत्र दिल्हे व९ सभानायकी धर्माधिकारिणी धर्मनीति-प्रमाणे नरसोजी जगदाळे देशमुख तपे मसूर व पाटील कसबे मजकूर यासी जयपत्र महजर करून दिल्हा मसूरचे वतन बापाजी मुसलमानास अर्थाअर्थी बोलावयास समध नाही हा माहजर सहि लेखन संख्यावोळी