Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
मलिकइनिस मोकासाई यानी खाने अजम दावलखान हवालदारास उभयतानी पत्र आणिले मग तिही मनास आणून आपणास बोलावून निरोप दिल्हा की कसबे मसूर परगणे कर्हाड तेथील वेव्हार आहे, विज्यापुरीहून पत्रे घेऊनल आले आहेत तरी तुह्मी धर्मत निवाडा करणे ह्मणऊन निरोपन दिल्हा यावरून मग यास धर्मचौथरियावरी नेऊन सभा करून उभयताची उत्तरे मनास आणिता अग्रवादी नरसोजी बिन कुमाजी जगदळे यानी तकरीर केली की आपला वडील आजा बाबाजी तपे मसूरची देसमुखी व कसबाची पटेलकी करीत असता आपला अजा यास दोघे पुत्र वडील विठोजी धाकटा कुमाजी निपट लहान होता ऐसे आपल्या वतनावरी असता कसबे मजकूरी पीर जलालुद्दीन आहे याचा किताब की मुसुलमानाचा परि आणि हिंदूचा वरि तेथे उजवे बाजूस हिंदूनी खैरात करावी, डावे बाजूस मुसलमानानी कदोरी करावी ऐसा दडक पुरातन चालिला आहे व इनामती व बाजे जे मिळकत ते दो ठाई घेऊन हिदूनी अतीत-अभ्यागतास खर्च करावा, मुसुलमानानी फकीरफकराना खर्च करावा. ऐसे असता, तपाचे मुसुलमान मिळोन मुजावरास बळ देऊन ते पध्दति मोडिली मग आपल्या अज्याने मुजावरास दटावून सागितले की महत् कदम जे चालिले आहे ते चालो देणे ऐसी ताकीद केली तो च कुसूर धरून दोघ चौघ मारेकरी मेळवून आपला अजा व आपला चुलता यास मुजावरानी जिवे मारिले आपला बाप कुमाजी हा धाकटा होता मग आपले अजीने माहेरास नेऊन वाढविला तनास मुतालीक देऊन आपला बाप आपल्या अजीने माहेरी च ठेविला पोरका होऊन वतनास आला मुजावरानी आपले वडील दोघे जण बाजगुन्हाई मारिले ते तिघे मुजावर आपल्या बापाने मारून सूड घेतला त्यावरी अबदल हुसेन याने तलब केली आपला बाप भेटला नाही बापाजी मुसुलमान याचा बाप याकूब हा कर्हाडचा बागवान बख्तवार असे आपले गावी देवघेव करीत असे गैरहगामी रयतास पैसे लावून मारामारी करू लागला मग आपल्या बापाने त्यास ताकीद केली की काय तुझे देणे असेल ते हगामसीर घेणे ऐसी दोघासी बोलाबोली जाहाली रयतास निरोप दिल्हा कर्हाडिचा नेब याच्या लेकास याकुबाची लेकी दिल्ही होती त्याची पाठी करून, आपल्या बापाची पाळती करून, धरून कर्हाडास नेले आपले घरदार वस्तभाव लुटिली व मुजावरास मारिले तो हि कथळा माथा ठेविला देशमुखी व पटेलगी अमानत केली आपला बाप तीन वरसे बदखानी होती मग चरेगावीचा महादाजी पाटील याने कर्हाडास जाऊन रदबदली केली मग नेबाने आपल्या बापाचे माथा खड होन साडेच्यार हजार करार ठेविला तीन हजार होन द्यावे पटेलकी सोडवावी, ऐसा तह करून, जमान घेऊन, याकुबास बराबरी देऊन मसुरास रवाना केले मग आपला बाप वाटेहून पळोन गेला त्यावरी देसमुखी व पटेलकी अमानत केली होती तिचे कमावीस याकुबाचे हवाली केली त्यावरी याकुबाने कुफराना केला की आपले समधी मुजावर मारिसे व आपले देणे होते ते देऊ दिल्हश्े नाही ह्मणऊन नेबापासून पटेलकी दुमाला करून घेतली. देशमुखी अमानत राहिली ऐसे सख्तीने बख्तवारीच्या बळे जोरावरी केली त्यावरी आपला बाप वृध जाहाला होता तो मरोन गेला मग आपण जगद्गुरु पातशाहापासी उभे राहिलो पातशाहाने अबरखानापासी मुनसीफी दिल्ही त्यानी निवाडा केला की, साडेच्यार हजार होन दिवाणात खड बाधला, तुज काय समध, ऐसा निवाडा करून दूर केला मग आपल्या बापास रजा फर्माविली की, दिवाणात खडकतबे पडिले ते सुटत नाहीत, खडाचे पैके देऊन आपली वतने दुमाला करून घेणे, याकुबास समध नाही ऐसा निर्वाह जाहाला मग आपण खडाचे पैके कबूल करून, अर्धी पटेलगी दुसरियास विकत दिल्ही, आणि दीड हजार तीन वरसानी होन दिवाणात द्यावे आणि पटेलकी सोडवावी ऐसे केले त्यावरी सातपाच मुसुलमान हुजूरचे अकारीब याची पाठी करून आपल्यावरी जुलूम केला मग मलिकइनीस मोकासाई यानी कर्हाडचे थळ दिल्हे तेथे हि मुसुलमान खोटा जाहाला ते हि मुनसफी मनास आणून निर्वाह करावा त्यावरी बापाजी बोलिला की, कर्हाडीची मुनसफी पाठी राखोन केली त्यास आपण कबूल नाही, आपल्यास दूर थळ द्यावे त्याजवरून साहेबाच्या थळायस पाठविले आहे नागवण बाधोन दोनी वतनास खलेल केले आणि मज च वेव्हारास हिंडवितो तरी देवाचे ठाई गोत माय बाप आहा जो निवाडा तुह्मी कराल त्यास आपण राजी असे ऐसी तकरीर लेहून दिल्ही