Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)

                                                               पत्रांक ११.

इ. स. १७६५ ता. १४ जून                                              श्रीहेरंब.                                                       १६८७ ज्येष्ठ वद्य ११


राजश्री नानास्वामींचे सेवेसीः-
उभयेताचे सां नमस्कार विनंती उपरी आपण पत्र पाठविलें ते पावोन लि।। मा।र समजला. ऐसियासी अवघ्या मनसब्यांत मुख्य आबरू च आहे. तिची न्यूनता जाल्यानें मग फल काय ? अस्तु. आपण लौकर यावें. प्रथम येथें मनसब्याचा डौल झाला तो समक्ष च आपणांस समजला आहे. तेच मर्जी हा कालवर असे. गकार नामक आले. त्यांनी फार नरमपणें भाषण केलें. परंतु तात्पर्य श्रीमंताचें ध्यानांत आहे. त्यास सांप्रत इतकें च ठरलें कीं, उभयतांच्या भेटी व्हाव्या. जें बोलणें चालणें असेल तें परस्परें समक्ष च व्हावें. त्यांत कांही गोष्ट ठरोन रहस्य जालें तरी उत्तम नाहींतरी त्यांनी भीमा उतरून दक्षणतीरी जावें. यांनीं अनंदवल्लीस अथवा आसपास असावें. उपरांत परस्परें चित्तास येईल ते करावें. ऐसें जालें आहे. गकार फिरोन गेले. इकडीलही चिंतो अनंत पाठविले आहेत. त्यांनी येणें तरी पांचा सा स्वारा. नसीं यावें अधिक न यावें. ऐसे स्पष्ट जालें असे. ते येतील. यांची त्यांची समक्षता होईल. परंतु त्यांशीं यांनीं काय बोलावें हा इत्यर्थ अगोदर जाला पाहिजे. तरी आपल्या व्यतिरिक्त हें ठरत नाहीं. यास्तव अविलंबे यावें. राजश्री बापू विंचुराहून रविवारीं त्रयोदसीस च दर्शनास येणार. तेच वेळेस वस्त्रेंहि होतील. आपले भेटीअंती आजपावेतों जालें वृत्त सविस्तर निवेदन होईल. स्वकीय कार्याचा मा।र लि।। त्यास जो करार आपल्यास ठरोन त्याविसीं यादीहि जाली आहे. त्यांत कोणेविसीं गुंता नसे. त्या यादी पाठवाव्या तेणेंप्रों। निर्गम होईल. सनदापत्र हातास येऊन कराराची यादी हि पाहिजे तरी ते हि आपल्यापासींच राहील. चिंता नाहीं. भेटीअंती सविस्तर कळेल. लौकर यावें. बहुत काय लिहिणें ? कृपेची वृद्धी करावी. पहिल्या यादी कराराच्या आहेत त्या पाहून सनदा द्यावयाची आज्ञा आहे. या हि पाठवून द्याव्या. आपण हि लौकर यावें. बापूचें वस्त्रासमई आपण असावें. उत्तम आहे. रविवारी दोन प्रहरा भेटीचा मुहूर्त त्याचा आहे. वस्त्राचा हि तो च. याजकरतां आपण लौकर यावें. हे विनंती.