Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)

                                                               पत्रांक १०.

इ. स. १७६५ ता. २० मे                                                 श्रीराम.                                                       १६८७ ज्येष्ठ शुद्ध १


श्रीमंत राजश्री नाना स्वामीचे सेवेसीः-
सेवक राघो मल्हार व बाजी नरसीव्ह कृतानेक सा नमस्कार विनंति. उपरी येथील कुशल ता। छ २९ जिलकाद मु॥ उजेन जाणोन स्वामींनी स्व-कुशल लिहीत आसलें पाहिजे. विशेष. स्वामींकडेस दोन तीन वेळां विनंतिपत्रे लि।। होतीं त्यास एक हि उत्तर आलें नाहीं त्यास कृपा करून सदैव पत्रीं लेखन करीत जावें. यानंतर आह्मांकडील सांप्रत्य सरदारीचा मजकूर तर बंदोबस्त आहे. राजश्री माहादजी गोविंद याचें आमचें चित्त शुद्ध नाही. सर्व भरवसा स्वामीचा आहे. दरबारचा बंदोबस्ताचा गुंता स्वामीकडेस आहे. त्यांस तेथील बंदोबस्त तीन चार निदान पांचपर्यंत करार ठराऊन निमेच्या ऐवजाच्या हुंड्या कराव्या आणि निमे सा महिनियाचा वायदा ठरावून कामकाजाचा गुंता उरकून घ्यावा. दिवसगतीवर न पडों द्यावें. स्वामीच्या वचेनावर इतका प्रकार जाहला हें येश स्वामीचें. दुसरा अर्थ नाहीं. ऐवजाची (चा?) चितांत कांहीं कल्पविकल्प येईल, तर न येऊं द्यावा. वस्त्रें आणि हुंड्या निमेच्या बरोबर कराव्या. फडशा केला जाईल. सारांश हेच विनंति कीं तेथ दरबारीं स्वामींनीं निशा करून सर्व गुंता वस्त्रें आदिकरून उरकून घ्यावा. रुाोविसी चिंता तिळतुल्य न करावी. आम्हीं सर्वप्रकारें सेवक दरबारचे आहोंत. दुसरा अर्थ नाहीं. वरकड कचा प्रकार राजश्री रावजीनीं लि।। आहे. त्यावरोन कळों येईल. सेवेस श्रुत होय हे विज्ञप्ति.