Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्रीवरद.

लेखांक ५.

१७०२ ज्येष्ठ वद्य ३.
पो। छ २५ रमजान

विनंति कीं :- स्वामीचे आज्ञापत्राप्रमाणें नजबखानासहित पातशहा यासी इंग्रजांचे पारपत्याची तहबीर करावयाची शफत घेतली. व श्रीमंत स्वामीनीं सामील व्हावयासी निजाम अल्लीखानास त्यांचे वकिलाकडोन नजबखानानीं लिहिले. त्याची पत्रें स्वामीस व श्रीमंतांस घेऊन पाठविलीं आहेत. त्याजवरून पातशहाचा शुका पाऊन वृत्तांत श्रुत होईल. तात्पर्य, अंत:कर्णातून इंग्रजाची नड पातशाहींतून काढावी व सरकारचे फौजेस सामील व्हावें. परंतु कदाचित आपण तिकडे सलूख केला तर इकडे इंग्रज यांसी समीप आहेत हे त्यांचे पारपत्य करितीलसें दिसत नाहीं, पेचांत येऊं, यांत शंकित. तेच सेवकांनी खातरजमा केली. फिरोन सेवेसी विनंति लिहावयासी बहुत ममतेनें नजबखानास सांगितले. ते श्रीमंत स्वामीचे सेवेसी विनंति लिहिली आहे. त्याजवरून श्रुत होईल. मुख्याचे मनांतील भाव, इंग्रजांसी आपण सलूख न करावा, ते जेर जालियावर यांनी त्यांचे प्रांतासी खलष करावयाचे समई सरकारचा एक सरदार मातबर फौजेचा, नि:कपट, पातशहापासीं असल्यास नजबखान चाकरी करील, यांत संदेह नाहीं. इंग्रजांची ताबेदारी न करावी, स्वामीचे फत्ते व्हासवी, हें अंत:करणापासून शफत वाहून वारंवार बोलतात. इंग्रजासीं स्वामींनीं एकोपा केलियास सरदार फौजेसहित येऊन जाटाचा प्रांत व जयपूर प्रांत नजबखानापासून सोडवितील व धाकांत शंकितही आहेत. यास्तव स्वामीशीं नि:कपटता करून सरकारची फौज सामील करून घेऊन, इंग्रजासी बिघाड करून, आपले प्रांतास उपद्रव न लागावा या मनोदयास्तव सरकारच्या फौजेची इच्छा करितात उभयतां सरदार एकचित्त होऊन, हिंदुस्थानांत येऊन, यांचे संरक्षण करून, पुढे यांजला दाढी देतील हा यांजला भरंवसा पुरता पुरत नाहीं. सेवकानें सरदारांकडोनही खतरजमा केली व पत्रोपत्रीं स्नेहवृध्दि सरदारांची यांची केली.परंतु मनांतून शंकित होऊनही म्हणतात कीं, इंग्रजासरें तुह्मी सलूख कराल तर इंग्रजही दिल्लीस येतील, तेव्हां आह्मांस कुमक कोणाची येणार ? यास्तव वारंवार सलूख न करावा एविषई नजबखानानीं सेवकास सांगितलें व सेवेसी पत्रांतही याच प्रकारे लि।। आहे, ते श्रुत होईल. पातशहाचे मनांत नजबखान नसावा व याचे कबजांत न रहावें, स्वामीचे काबूंत रहावें. दिल्ली-अगरियांत स्वामीचा बंदोबस्त असलियासी पातशहास सुख आहे. परंतु नजबखान नसावा हे अंत:कर्ण पातशहाचें आहे. यास्तव सेवेसी वि॥ रा। हरिपंत अथवा रा।। महादजी सिंदे एकाने दिल्लीस राहून दोन लक्ष रु।। दरमहा पातशहास खर्चास देऊन हे स्थलीं करोडोंची हस्तगत करावी व पातशाही हुकूम आपले ताबे ठेवणार स्वामी समर्थ आहेत. नजबखानानीं पत्रें बहुत स्नेहवृध्दीनें लिहिली आहेत. यांची उत्तरे पाठवावी.