Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक ३७७.
अजम राजश्री सेख हसन शेख इसमाईल सुभेदार मा।। बाणकोट यांसि:-
मोईबान मुखलिशान-दस्तगा अजदिल एकलास-रामभट आगाशे खोत कुलकर्णी मौजे राहाटगर हालीं वस्ती पुणें दुवा आं की येथील खुशी जाणून आपले कडील हकीकत लिहीत जावी. दिगर तुम्हीं पत्र पाठविलें पावलें व हयात खान जमातदार यांनीं सांगितले वरून सर्व अर्थ कळला. व आपण पत्र पाठविलें तेंच बजिन्नस श्रीमंत राजश्री नानास दाखविलेंवरून श्रीमंत संतोष जाहाले. इकडील मजकूर तुम्हांस कळावा या अर्थे हयातखान जमातदार यांस पाठविलें आहेत. हे खुद जबानीं सांगतील त्याजवरून कळों येईल. राजहंसाचा मेळा पाहून आम्हीं मुरंबीपणा केला ते पक्षीं मोत्याचा च चारा खात आहेत. जमेदारीचे रीतीनें कांहीं खिजमत घ्यावयाची असलिया- लिहीत जाणें म्हणून लि।।. त्यास इकडील जमीदारीचें आम्हांकडें आहे च. आपले तर्फेची इनाम जाहाल्यास आपल्याकडील ही जमीदारी होईल. दोस्तीचे जागा ज्यादा काय लिहिणें ? लोभ करावा. बारीक मोठया गोष्टी कित्येक तुमच्या मनांत असतील त्याच आमच्या मनांत आहेत. त्या अन्वयें सूचना मात्र आम्हांस करावी. श्रीमंतांच्या कानावर घालून बंदोबस्त केला जाईल.आपण इनाम आम्हांस करून देविणार म्हणून हयातखान यांनीं सांगितलें त्यास कुटुंबाचा योगक्षेम चाले असें करून देविल्या फार उत्तम आहे.