Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्रीभवानीशंकर

लेखांक ३७६.

राजश्रियाविराजितराजामान्यराजश्री भाष्करपंत स्वामी गोसावी यांसि:-
पोष्य दादो नरहर सां।। नमस्कार विनंती उपरी येथील कुशल जाणून स्वकीय स्वानंदवैभव लिहीत असिलें पाहिजे. विशेष. आपण स्मरणपूर्वक कृपापत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन लेखनार्थ अवगत जाला. एसेंच निरंतर पत्रीं संतोषवित असावें. यानंतर राजश्री संताजी अंबाल्याबद्दल बाकीचा मजकूर लिहिला त्यास अवघे गांवकरी मिळोन पट्टी करून दिधली. त्याजमध्यें संताजीवर दोनशें रुपये लिहिलें. त्याजवरोन संताजी ह्मणो लागला कीं आपल्याकडे चौघा भावाबरोबर जमीन नाहीं. आपण इतका रुपया कोठून द्यावा. जमीन मोडून द्यावी चौघाभावाप्रमाणें जमीन असलिया पट्टीचा रुपया लिहिल्याप्रों।। देऊं मग करार ठरला कीं जमीनीची वाट जालिया अधिक उणें पाहून घेऊं. मग पट्टीपैकी रुपये १५० दीडशें वसूल दिधला. बाकी रुपये ५० पन्नास त्याजकडे तैशीच राहिली पुढें जमिनीची समजावीस व्हावी. तों तितक्यामधें आपल्याकडून कामकाज निघालें. आतां तुम्हांकडे कामाचा अधिकार आहे. वाजवी गैरवाजवी ध्यानांस आणून जैसे विल्हें लावायाचे असेल तैसें लावावें. तुमची हि शुक्रगुजरी नेकी गांवकरी यांणी फार सांगितली. आणि परस्परें ही ऐकिल्यांत आली. त्यास राहतां हेंच राहतें. वरकड कामकाज बरें वाईट होतच आहे. सूज्ञाप्रती विशेष काय लिहिणें ? कृपालोभ असो दीजे हे विनंति.