Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्री.

लेखांक १७३.


१६९८ अधिक भाद्रपद शुद्ध ८.

नकल पत्राची पेशवे माधवराव यांहीं कारनेल आपटणास लिहिलें त्याची नकल :-
आतां तुमचे अर्जास जाब लिहितो :-

श्रीमंत रघुनाथराव यांसी तहनामा लिहिला होता कीं, त्यास पैका आणि त्यांही राहावें तें आह्मी आता फिरवितो. त्याची वगत आह्मीं श्रीमंत रघुनाथराव यांची निशा शुद्ध हृदयापासून कबूल करितों कीं, त्याही राहावें श्रीबनारसमध्यें. त्यास पैका अथवा गांव रुपया पांच लाखांचा करार करीन, परंतु त्याही गांवामध्यें फितूर अथवा हंगामा फिरून न करावा आणि हरकोण्हापासीं हंगामाची मैत्री न करावी व आह्मांस सांगितल्याखेरीज त्याही त्याचेच मुक्काम न फिरवावे. १

आमची इच्छा सर्व जनराल कौवशेल कलकत्त्याचे त्यासि अर्जी करावी कीं, दोस्तीचें त्यांही लिहावें. बनारसवाल्यास त्याच्याच तर्फेने श्री. रघुनाथरावास पैका द्यावा. जो करार होईल तो त्यास ५ लाख रुपयास आह्मी मराष्ट्र गावांमधून काल्पी अथवा परगणें ह्या कार्यास ठराऊं. १

आह्मी हुकूम करूं त्या पैक्यास अथवा गांवासव चालता करावयासि ज्या दिवशीं रघुनाथराव कबूल करितील हा करार वरती लिहिल्याप्रमाणें त्या दिवसापासून देऊं. परंतु पैका देणें अथवा गांव श्री. रघुनाथराव बनारस पावलियानंतर. १

ह्या कार्यास थोडे दिवस बंदोबस्तास लागतील त्यास्तव मुंबईचे जनराल कौवशेल यांही श्री. रघुनाथराव यास जामीन राहावें कीं, श्रीमंतांही सुरतेस राहावें जवपर्यंत हा करारजाब ठराऊन पाठवितील; परंतु त्याहीं फितुर कार्य अथवा हंगामा न करावा. १
ह्या कार्याचा जाब लिहावयासि हैगई न करणें आणि नवा तहनामा न करावा आह्मी निश्वई केला असे याखेरीज दुसरेन करावें ऐसे असोन श्रीमंत कबूल न करतील तर इंग्रेजांनी ज्या बंदोबस्तात गुंतल्यात त्याचप्रमाणें चालावें.

तुह्मांस अर्जी करितों की ही सर्व हकीकत मुंबईच्या जनराल कौवशेल यास लिहिणें व जाहीर करणें आमचा हाच निश्वैई ज्यादा काय लिहिणें ? ता. २१ आगोस्त सन १७७६.