Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्री.

लेखांक १७२.


१६९८ अधिक भाद्रपद शु. ८.

कारनेल अपटण यास पत्र जे. निमकहरामी चाकरांनी फितूर केला. सबब मुंबईकरांचे विद्यमानें कंपनीच्या मोहोरेनसी इंग्रजाशीं तह करून कुमक घेतली. फितुरियांस जरबहि बसली. पुढें करारा-प्रों। मसलत सेवटास जावी, इतकियांत तुमचें येणें पुरंधरीं जालें. तेथें जसें तुमच्या समजण्यांत आलें तसा तह ठराऊन इंग्रजी कुमक महकूब केलीत त्यामुळें लढाईहि महकूब जाली. आह्मीं सुरत जागा कंपणीची जाणोन तुह्मां इंग्रज लोकांचेच भरवसीयावर तीन महिने जाऊन राहिलों. आपल्याकडील. हि इंतजारी केली कीं, आमचे पल्याशी तऱ्हें आपण काहाडतील. ती कांहीं दिसोन आली नाहीं. आह्मांस तर खर्चाची मोठी वोढ. ते कोठपरयंत सोसावी ? शहरचें राहाणें. घांस लकडी देखील विकत घ्यावीं. पैशाची तर अबादानी नाहीं. इतकी हि तसदी सोसून इंग्रजाचे भरंवसियावर राहिलो असतां किल्ले धार येथें कबिला व चिरंजीव मूल दिडावर्षाचा लाहान तेथें आहेत. त्यास फितुरियाणीं फौज पाठऊन मोर्चे लाविले. फितुरियांणी लढणें अगर बोलणें तें आह्मासी असावें. बायकोलांस तसदी करावी हें योग्य की काय ? चहूंकडून पेंचच जाणोन बाहेर निघालों. तुह्मांस हें वर्तमान कळलें असतें तरी तुह्मी त्यास निषेध केलाच असतां तस्मान तुह्मांस हे खबर नसेलसें दिसोन येतें. यास्तव हें सविस्तर तुह्मांस लिहिले असें. आमचे कार्यसिद्धि उत्तम होय ते नेकसलाह लिहिणें. छ ७ रजब.