Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्री.

लेखांक १६८.


१६९८ आषाढ.

पु॥ विज्ञापना. हुजूर येण्यासंबंधें मार तरी : तीन प्रकारची आज्ञा एक वेळच आली. त्यास सेवकास महाराजाचे मर्जीसिवाय कोणासी दरकार नाहीं. येण्यास गुंता काडीमात्र नाहीं. बलावून घेतल्यास सेवकास फार संतोष. येथें राहिल्याने हवा मानत नाहीं. पाणी फार वाईट. बराबरील माणसेंदेखील कितेक दुखण्यांत पडली आहेत +++ अस्वस्त. लष्करांत आल्यानें फार चांगलें आहे. तीन प्रकारचे आज्ञेंतून सेवटचे पत्रांत निश्चय खास-दस्तुरें नच येणें, तेथेंच उपयोग, ऐसे लिहिलें आहे त्यावरून येण्याची जलदी न केली. जनरालाची तरी प्रसन्नता सेवकाचे ठाई बहुत दिसत्ये, परंतु येथें राहण्याविसीं पत्र मागावें तरी पूर्वकथन संपूर्ण सांगितले पाहिजे. त्यांतही करनेलीची नालीशच होते. व स्वरूपासही ठीक नाहीं तरी आबच जाईल. तथापि युक्तीनें आब राहून पत्र देतील तर पाहातों. नाहीं त्यापक्षीं निघोन यावयाचें करितों. परंतु बंगाल्याचे पत्राचा जाब काय येतो, पुढें हे काय करितात, हें सर्व मनांत आणून किटणीवर तेथील यखत्यार आहे तैसा राखतो, असें असिल्यास निघोन येतों. तूर्त मसलतीचे रीतीनें सेवकाचें येथे राहाणें यांत उपयोग फार दिसतो.

जनरालास कोसलदारास हरयेकाध गोष्टीची भीड पडोन ह्मटलें तसें ऐकतील. लक्ष्मण गोपाळ आहेत. परंतु यांचे वजन नाहीं. सेवकाचें येथे हजर जाल्यावर, मग कोणी तरी शाहाणा माणूस येथें जरूर ठेविला पाहिजे. परंतु माहीत व मातबर असा ये गोष्टीस वाकब असावा. ह्मणजे हे चहातील. लक्ष्मण गोपाळास तरी किमपि वाकबगारी नाहीं. महाराजाची वळखच नाहीं, तेव्हां माहितगारी कोठून असणार? सेवकास हुजूर आणवितों ह्मणोन किटणीसी करार महाराजांनी केला असेल. त्यांस, सेवकाचे शरीरी अस्वस्त नाहीं, हे सारे कोसलदारांस ठाऊक आहे. गोष्ट खरी आहे व जाहाजांत अस्वस्ततेुळें बसवत नाहीं. यामुळें येण्यास विलंब. हे कारण सांगितलें तरी रुचेसें आहे. बंगाल्याचे पत्राचा जाब आलियावर निघोन येतों. आणि लौकर यावेसे मर्जी असल्यास आज्ञापत्र सादर व्हावें, ह्मणजे तसाच निघोन येतों. करनेलीचे समाधानास्तव सेवकास हुजूर बलावून घेतल्यानें तरी पुढे करनेल नीट वर्ततील, ऐसे कदापि होणार नाहीं. यास्तव बलावण्याचीहि त्वरा करूं नये, हें चांगलें दिसतें.