Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक १७५.
१६९८ अधिक भाद्रपद वद्य २.
मंजूर
करनेल कीटिंग यासी पत्र जे :- तुह्मी पत्र छ ३ रजबचें पाठविलें तें पाऊन संतोष जाहला. विलायती जाहाज छ २ मिनहूस मुंबईस पोहचलें. सरकारचें करारमदार जाले ते कंपणीनीं मान्य केले. व जनराल व कोसलदार कलकत्तेकर यासी कंपणीचा हुकूम आला कीं, इकडील सरकारचे बंदोबस्तात अनुकूल होणें, उन्मूल हुकूम न करणें व कंपनीचा फर्मान येथों आला तो अद्यापि खुला जाला नाहीं. याचें सविस्तर वर्तमान जनरालास विचारून मागाहून लिहून पाठवूं व मिस्तर टेलरचें पत्र छ १७ जमादिलावलचें जनरालास आलें की सरकारचे बंदोबस्ताविशीं जें कोशिष होईल तें उत्तम प्रकारें करीन व सर जनराल व कोसलदार कलकत्तेकरास सरकारची पत्रें पाठवावयाविसीं कितेक मजकूर लिहिला व मुंबईकर जनरालासही पत्र लिहावें कीं, कंपणीचे सरकारची फौज सरकारचे मदतीस येईल ते सेवकाचे तैनातीस करून हुजूर पाठवावीं. ऐसे कितेक मजकूर लिहिले ते अक्षरशाह ध्यानास आले. ऐसियासीं, आह्मीं ज्या गोष्टीची मार्गप्रतीक्षा करीत होतों तेंच तुह्मीं खूषखबर विलायती जाहाज येवून पोहचल्या लिहिली. यावरून बहुतच संतोष जाहला. कंपणीचा फर्मान जनरालास आला, त्यांतील अर्थ सविस्तर लिहून पाठविणें. मिस्तर टेलर बहुत शाहाणे व सरकार कामाचे उपयोगी. ते जो उद्योग व तर्तूद करतील ते सरकारउपयोगी उत्तम करतील. सर जनराल व कोसल कलकत्तेकर यासी पत्र तुमचें लिहिल्याचे अन्वयें पूर्वीच लिहून, एक पत्र मिस्तर टेलरास ऐसी दोन पत्रें कलकत्त्यास रवाना केली. मुंबईकर जनराल हे अंत:करणापासून सरकारचे कार्यास उत्तम उद्योगप्रयुक्त आहेत. हे अर्थ अनभवास व निदर्शनास आले व पुढेंहि पुरतेंपणें येतील, बेभरवसा याचाच आहे. यासहि पत्र लिहिलें आहे व तुमची सेवाचाकरी व निष्ठेचे अर्थ हुजूर दृढतर आहेत. कंपणीचे सरकारची फौज सरकारचे मदतीस रवाना होती येसे सिध जाल्यास हे फौज तुमचे तैनातीस देऊन हुजूर रवाना करावे ह्मणून मुंबईकर जनरालास पत्र लिहिलें जाईल येविसींची खातरजमा आसो देणें. हिंदवी लाखोटा हिंदुस्थानातूंन आला ह्मणून तुह्मीं पाठविला तो पावला. जनराल करनेक यासी कंपणीनीं मुंबईचे जनरालाखाली पाठविलें ह्मणून मजकूर लिहिला तो कळला. खासा स्वारी सुरतेंत कंपनीच्या घरीं होती. परंतु खर्चाची वोढ फार व किले धार येथे कबिला व चिरंजीव लाहान आहेत. तेथें फितुरियाणीं फौज पाठवून मोरचे बसविले. सबब सुरतेहून बाहेर निघालों. सरकारचे फौजेसहि बोलाविलें आहे व सांप्रत्य विलायतेचाहि हुकूम आला आहे. तरी श्रीकृपेनें फितुरियांचे पारपत्य होऊन लवकरच बंदोबस्त सरकारचे दौलतीचा होईल. तेथें जनराल व कोशलदारांची खातरजमा आमचे तर्फेनें करणें कीं, मुंबईकर आंगरेजासी दोस्ती दिवसेंदिवस ज्यादा आहे. खर्चाचे तंगीमुळें व धारेस कबिला व चिरंजीव आहेत त्या किल्ल्यास मोर्चे बारभाईकडील लागले याजमुळें सुरतेहून बाहेर निघोन किल्ले अर्जुनगड व पारनेरा येथें आलों. कांही परगणे जफ्त केले थोडाबहुत खर्च चालतो व दमणकराचे मार्फातीनें गोवेकर फिरंगियासी संधान लाविलें. परंतु आमचें खरें लक्ष बंबईचे आंगरेजाकडे आहे. गोव्याची कुमक आली तरी येओ. कामाहि सुरूं होईल. कारण, जे दिवशीं विलायतचा हुकूम बंबईचे जनराल कोशलास येईल व त्याचे लिहिले आह्मांस येईल ते दिवशीं त्याजवळच येऊं. तूर्त त्यास खर्चाचे संकट. सबब, च्यार दिवस या मुलकांत गुजराणा करितों. जाणिजे. छ १६ रजब.