Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक १६९.
१३९८ श्रावण शुद्ध २.
जनराल यास व कोषलास याचप्रों। दोन पत्रें लिहिलीं आहेत.
जनराल मुंबईकर यास पत्र कीं : आपण आमची कुमक केली ती वाजवीचेच रीतीनें केली. मसलतहि तीन हिस्से जाहाली होती. इतक्यांत बंगाल्याहून मनाई आली. मागाहून कारनेल आपटण आलें. त्यांनी आह्मांस व आपल्यास कांहीयेक गोष्ट न पुसतां फितुरियांचे संमतांत मिळोन, गैरवाजवीचाच पक्ष धरून, पंचवीस हजार रुपये आह्मांस दरमहा द्यावे आणि फितुरियांची माणसें आमचे रखवालीस कोपरगांवीं रहावें-असें जालें असतां, आपण सर्व गोष्टी मान्य करून आह्मीं कंपनीच्या पेट्यांत जागा देऊन थोडें बहुत खर्चासहि देतां व आमच्या कामाकरितां विलायतेस लिहिलीं पाठविलीं आहेत. तुह्मी तर मसलत उभी करून सिद्धीस न्याय हे खातरजमा आहे. परंतु जर्सी आपली लिहिली विलायतेस गेलीं तसीं बंगाले-कराचीहि गेली असतील. तेव्हा विलायसेत कोशल होईल. उभयतांतून कोण्हाचें मंजूर पडेल ते माहितगारांचे अर्थ तुह्मी जाणा. तथापि विलायतेचीं लिहिली यावयास अवकाश तों फितुरी जबरदस्त होतात व दौलतीचीहि नुकसानी फार होते. आजतागाईत निजामअल्लीखान यास साठ लक्षांची जागीर दिल्ही. व हैदर नाईक धारवाडपर्यंत मुलूक, किल्ले, ठाणी दाबीत आले. हिंदुस्थान वगैरे मवासियानें तमाम मुलूक दाबिला. करोड सवाकरोड रुपयाचा मुलूक दौलतींतील गेला. पुढें दिवसगत लागल्यास आमचाहि बंद राहणे कठिण. आमचीं राजकारणें सरदारांची वगैरे आहेत. तीहि नाउमेद होतात. बंगालेकर सर जनराल यांस पत्र लिहिलआहे. त्याची नक्कल तुह्मांस पाहावयास पाठविली आहे. खसूसीयत दस्तगाहा लक्ष्मण अपाजी दाखवितील. आपण तरी आमच्या कार्यास सर्व गोष्टीनें उमेदवार परंतु बंगालेकरांपुढें तुह्मीं काय कराल ? बरें ! आपली दोस्ती आहे ती कायमच असावी. आमची दौलत आपण काईम करून द्यावी, ही तर तुह्मांस मोठाच चिंता आहे. त्याअर्थे कोण्हीयेक आमचा दोस्त आमची मसलत सिद्धीस न्यावयास उभा राहिल्यास, आपली मर्जी त्यांत असल्यास, कार्य लवकर घडोन येईल. कारनेल अपटण याणीं तह केला कीं, नारायणराव याचा मूल खरा. परंतु तो मूल नारायणराव याचा नव्हे. याचा मुद्दाहि बिलफैल आह्माजवळ आला आहे. चौकसी करून पाहावी. वरकड जवाहिराचा व कितेक मजकूर लक्ष्मण आपाजीस लिहिला आहे. ते सांगतील त्याजवरून कळेल. छ ३० जमादिलावल.