Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्री.

लेखांक १७६.


१६९८ अधिक भाद्रपद वद्य ७.

राजश्री लक्ष्मण आपाजी सो॥ यांसि :-
सु॥ सबा सबैन मया व अलफ. तुह्मीं विनंतिपत्र पाठविलें तें प्रविष्ट झालें. जवाहिराविशीं जनरल याशीं बोलणें जाहलें. निकड केल्यास जवाहीर देतील. त्यास, जनराल कोषल याच्या नावें आठाआठ दिवसांच्या तफावतीनें पत्रें पाठवावीं, ह्मणोन लि।। तें कळलें. ऐशास दवणेकडे आलों. फिरंगा यांसि सीलसीला लाविला. याचें कारण मी सुरतेत राहिल्यानें पुढें बारभाईच्या फौजा येऊन उभ्या राहतील, मग मसलतीस बळ पडणार नाही. याचकरितां जलदी करून इकडे आलों. परंतु अंगरेजाचा भरवसा पक्का. थोर तरांडे. पल्यासहि याच तराड्यांत पाहोंचवावयाचें. हें समजोनच त्यास तोडावयाचे नाहींत. इकडे येऊन लहानमोठीं राजकारणें करून पाहतों. दोस्त जे कोणीं आहेत त्यांच्या गळ्यांत हात घालतों. मेळऊन घेतों. परंतु थोर जो भरवसा आहे तो एक अंगरेजाचा. तेव्हां जवाहिराविसीं निकड केल्यानें अगदींच तोडलेसें त्याच्या चित्तांत येईल. आधीं सुरतेंहून निघालों, इकडे आलों, तेसमयीं त्यास न विचारले. हें एक त्याचे चित्तांत काय आलें असेल तें न कळे. आणि जवाहीरही निकडीनें मागितल्यास त्यास परिछिन्न भासेल की, उठून गेले. आणि आह्मांस त्याचा दरकार. याजकरितां त्याजवळ झटून मागवूं नये. जवाहीर त्याजवळ असल्यानें त्यांसही हेंच समजले कीं, मसलत आह्मांवरच आहे. चार दिवस खर्चाच्या वोढीमुळें व बारभाईच्या पेंचामुळें बाहेर पडेल, पोट भरलें, परंतु अंगरेजाखेरीज दुसरा विचार नाहीं. याप्रों।। तुह्मीहि त्याची खातरदास्त करावी. संतोषानें त्याच्या चित्तांत दुसरा विचार न येतां, जवाहीर दिल्यास घेणें. परंतु जनरालाच्या समाधानानें जे गोष्ट होईल ते करणें. लिहिल्यावरून जनराल कोशल यास खलिते पाठविलें. परंतु लिहिला अन्वय सविस्तर ध्यानांत आणोन, याचे कोशल करून मनसब्यास युक्त असल्यास खलिते देणें. नाहीं तर न देणें, जाणिजे. छ २० माहे रजब.

(लेखनावधि:)