Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक १७१.
श्रावण शुद्ध १५.
राजश्री लक्ष्मण अपाजी यांसि :-
सु॥ सबा सीतैन मया व अलफ.
तुह्मीं विनंतीपत्रें आषाढ वद्य एकादशीचीं पाठविलीं तीं छ ६ जमादिलाखरीं पावलीं.
इंग्रेज मसलत सिद्धीस नेतील हा भरंसा धरूं नये. चिरंजीव अमृतराव यास बाहेर काढावें. समागमें राजश्री आबाजी महादेव यांस देवावे. आपण सुरतेत राहावें. सेनाखासखेल यांस मेळऊन घ्यावे ह्मणोन कितेक मसलतीचा धारेवट लिहिला तो कळला. ऐशास, सेनाखासखेल याचे लक्षाचा अर्थ तरी :-बडोद्याचे मुकामींहून त्याचें जें लक्ष आहे तें समजलेंच आहे. सांप्रत त्याचीही नजर बारभाईच्याच पक्षाची जाहाली आहेसी दिसते. फत्तेसिंगव सेनाखासखेल यांच्या भेटी जाहाल्या. पुढें त्याचा काय इत्यर्थ ठरेल तो पहावें. चिरंजीवास बाहेर काढावें, तरी आपले जवळ सामान किती? त्यांत चिरंजीवाबरोबर बाहेर काय काढावे ?
खर्चाविसी बहुत प्रकारें बोलतो. परंतु मेस्तर बाडमास हुकूम केला आहे त्याप्रमाणें देतील. जाजती देत नाहीं त्यावरून जवाहीर तरी द्यावें. कोशलांत गोष्ट काढावी +++++ सालाची ++++ केली त्यास उपाय +++++ राविसी बोलतों, मागतों, नच देत तेव्हां निरोपच मागतों. ह्मणोन लिहिलें तें कळलें. ऐशास, जवाहिराविसी कोशलांत गोष्ट निघोन इत्यर्थ ठरणार होता. त्यास कोशल होऊन इत्यर्थ ठरलाच असेल. व बंगाल्यासहि परवानगी जवाहीर द्यावयाविसी ह्मणोन मेस्तर होमासहि पत्र आलेंच होतें. त्यास, येथील खर्चाचे वोढीचे अर्थ जनरालासी बोलून, जवाहिराविसी झटून जाबसाल दोहा चहू रोजांत यावा असा आहे. तुचा जबाब साल आलाच असेल. बळ धरीत असल्यास उत्तमच आहे. इंग्रेजांकडूनहि त्यास उत्यजन देत जाणें. कलम १.
स्वामींनीं कोशेलदारास व आणखी इंग्रेजास पत्रें पाठविलीं तीं ज्याचीं त्यास प्रविष्ठ केलीं. दोन कोशलदार राहिले त्यास पत्र पाठवावें ह्मणोन लिहिलें. त्याजवर हाली मेस्तर गारडीन व मेस्तर इष्टाकहऊस यांस पत्र लिहिलें आहे व मोष्टिनाचा लखोटा होमानीं होमाचें नांवावर तें होतें ह्मणोन फोडला. त्यास, चिटणीसाजवळोन चुकोन नांव पडलें. हालीं मोष्टिनासहि पत्र लिहिलें आहे. पावतें करणें. कलम १.
आजचा निरोप मागावयाचा करार. त्यास, पुढें त्याच्या फौजा येऊन उभ्या राहातील, तेव्हां कोणेएक गोष्ट बारभाई आपटणास सांगतील आणि आपटण सांगतील आणि आपटण ह्मणतील ते गोष्ट मुंबईकरास कबूल करावी लागेल. मुंबईकराचाहि विलाज चालणार नाहीं. आणि तेव्हां राजकारणहि होणार नाहीं. यास्तव राजकारण करावयाचे दिवस हेच आहेत, राजकारण बनलें हि आहे. निरोप मागावयाचे खालीं. + + + त्यास, तो मूल खोटात्याचा मुद्दाहि सांप्रत आह्मांजवळ आहे. हें तुह्मी जनराल व कोसलासी बोलणें. कलम १.
एकूण कलमें आठ. जाणिजे. छ १३
जमादिलाखर.
(लेखनावधि:)