Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्री.

लेखांक १६५.


१६९८ आषाढ शुद्ध १.

अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य राजश्री लक्ष्मण आपाजी गोसावी यांसि :-
सेवक रघुनाथ बाजीराव प्रधान नमस्कार सु॥सबा सबैन मया व अलफ. तुह्मांकडे रु।। ३०० तीनसें पाठविले आहेत. तरी दोनशें रुपये तुह्मीं आपणास खर्चास घेणें व शंभर रुपयाची मेवा ईस्टुर वगैरे कोशलदार, आपले उपयोगीं पडत असतील, त्यांस त्यांचे मर्जी जोगा महिन्यांत येकदोन वेळा ज्या मेव्याचा जसा हंगाम असेल त्याप्रमाणें घेऊन देत जाणें. सदरहूं रु।। येथें अर्जुनजी नाथजी त्रिवाडी सुरतकर साहुकार याजकडे भरून याणीं वज्रभुकणदास तापीदास याजवर मुमईची हुंडी दिल्ही ती घेऊन पाठविली असे. तर सदरहूप्रमाणें ऐवज घेऊन पावलियाचें उत्तर पाठवणें. जाणिजे. छ २९ रबिलाखर. बहुत काय लिहिणें ?

(लेखनावधि:)
बार.