Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्री.

लेखांक १०३.

१६९७ आश्विन वद्य ७.

पुरवणी राजश्री लक्ष्मण आपाजी गोसावी यांसी :-

सु॥ सीत सबैन मया व अलफ.

कारनेल कीटिण याजकडे पहिली सरकारची उंटे दोनसें होती. त्याजवरी मनस्वी वोझें लादून खराब केलीं. ती मेलीं. हालीं बडोदियाहून कूच करोन यावयाकरितां पन्नास उंटे व साहासे बैल दिल्हें. ऐसे असोन, हाली शंभर गाडे प॥ डबाई येथील आणावयाकरितां दोनसे माणसें पाठविली आहेत. अगोदर तेथे राहून परगणा खराब केला. प्रस्थुत याप्रों। करितात. काहीं रीतीचा प्रकार राहिला नाहीं. कजीया करावा तरी दूर पहावें लागतें. याजकरितां तेथून यास पत्र येऊन सरकारचे हुकुमासिवाय वर्तणूक न करीत तें करणें. सर्वविषयीं वोढकता. तुह्मांस वाकफगारी आहे. दिवसेंदिवस अधिक ओढितात. इलाज नाहीं ! येविसी जनरालास पुसावें. मसलत काय सांगील त्याप्रों करावें. तूर्त मसलत तोंडीं येऊन बैद जाहाली. फौज व सिपाई दळ आहे, त्यास दरमहा पांच लक्ष रु।। पाहिजेत. येथें तरी लक्षाची प्राप्त नाहीं. मोठें संकट पडलें आहे. कोठें इलाज चालत नाहीं.सिबंदीची नित्य कटकट पडली आहे. कसें करावें, तो विचार लिहिणें. जाणिजे. छ १९ शाबान. बहुत काय लिहिणे ?

(लेखनावधि:)