Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड अकरावा ( १६९१-१७६०)
श्री.
१|१३ रास.
प्रकरण सहावे.
हाकीकत कसबे मंगळवेढा पोमजकूर अमलदारानी अमल पंत प्रधान पेशवे सन ११७२ मधे पौश मासी किले मिरजेस गोविंदराव नाना असतां श्रीमंत फौजानिसी येऊन उतरले. शाहा दिल्हा. गोपाळराव जमखंडीकर आपले फौजेनिसी उतरोन श्रीमंताचे फौजेवर येऊन छापा घालावा हा बेत करून राहिले होते. हे वर्तमान ऐकोन श्रीमंत माधवरावसाहेब यांनी व दादासाहेब यांनी गोपाळराव बरवे वगैरे ऐसे दहा हजार फौज जमखंडीचे तळापरयंत रवाना केली. हे बातमी गोपाळराव यास कळली नाही. गफलत जाहाली. फौज येऊन त्यांचे तळानजीक पाहतांच, एकाएकी सर्व डेरेदांडे टाकून सडे घोडियावर निघोन गेले. श्रीमंताचे फौजेची गांठ पडो दिल्ही नाही. मर्दुमीने निघोन मौजे नंदेश्र्वर पा मंगळवेढा या ठिकाणी येऊन उभे राहिले. फौज अगदी जवळ नाही. चौ वाटेने निघोन गेली. दहापाच स्वार समागमे राहिले. त्या रावतांनिशी मंगळवेढेस पौष शु. ११ एका दशीस चौथे प्रहरी किलेमजकुरी येऊन दाखल जाहले. एकादसी द्वादसी दोनरोज मु करून राहिले. त्यामुळे हे वर्तमान ऐकोन, आसपास यांचे फौजेपो स्वार आले होते ते किलेमारी येऊन, जमाव करून, च्यारसे स्वार परयंत जमाव करून, त्रयोदसीस किलेमाहून निघोन निजामअल्लीकडे कलबुर्गे प्रांती जाऊन, नबाबाची भेट घेतली. समागमे नारायणराव कृष्ण, त्यांचे चुलतबंधुसुध्दा जाऊन कल्याणीचे मुकामी भेटी जाहाल्या. नबाब बहुत खुशवख्त होऊन यांचा आदर बहुमान केला. गोपाळराव मोहरा श्रीमंताकडून यागी होऊन आपल्याकडे आला, हा चित्ताचे ठाई बहुत कांही संतोषाते मानून, याचा सर्व प्रकारे सरंजाम केला. तदनंतर नबाब व गोपाळराव उभयतांनी मसलत करून तमाम लष्कर खास स्वारीसुध्दां माघारी स्वारी मजलदरमजल भीमातीराने पुण्यापरयंत येऊन तमाम मुलुखाची खराबी बहुत जाहली. पुणे शहर येथील हवेल्या जाळून फस्त केल्या. श्रीमंताचे खासवाडा इमारतीची गोपाळराव गोविंद यांनी आपली फौजेचे तरफेस बरायेखुद खास उभे राहून श्रीमंताचे हवेलीचे रक्षण केले. आपली इमारती हवेली त्या स्थळी होती, ते लष्कराचे स्वारांनी जाळून टाकली, आपले हवेलीची अनास्था केली. हे वर्तमान श्रीमंतास कळले. त्यांचे ध्यानांत आले की, आपले इमारतीचे रक्षण न करता सरकारच्या इमारतीचे रक्षण केले. ऐसा सेवक एकनिष्ठपणे स्वामीशेवेसी तत्पर पूर्वीपासून ध्यानांत असतां कांही विकल्यामुळे चित्तांत रुष्टता येऊन त्याचे मन उदास होऊन हा बेकार जाहाला असतां, विवेक करून सरकारची हवेली रक्षली, त्याचे समजाविणी करोन पूर्ववतप्रमाणे चालवावे. ऐसी चित्ताचे ठायी योजना करून ठेविली. ते समयी श्रीमंतांच्या फौजा तमाम नामी सरदार गंगातीरी मोगलाई तालुकियांत मोकाम करून, मोगलाचा मुलूख खराब करून, अवरंगाबादचा सुभा शाहार तेथे श्रीमंत माधवरावसाहेब व दादासाहेब बरायखुद स्वारीसहवर्तमान फौजा शाहारास जाऊन, तेथील इमारती जाळून खराबी केली. परस्पर बरोबर उभयपक्षी जाहाले