Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड अकरावा ( १६९१-१७६०)
तमाम फौजा दुतर्फा व स्वराज्य मोगलाई दोनी दळ गंगातीराचे ठाई जमाव जाहला. मोगलाई लष्करांत गोपाळराव होते. त्यांजकडे समजाविसीकरितां मध्येस्त पाठऊन त्यांचा दिलखुलासा करून मंगळवेढेस आणिले. श्रीमंतांनी नारो शंकर व बापूजी नंदे यांस पाठऊन देऊन त्यांची समजाविसी करून श्रीमंताकडे गोपाळराव यास घेऊन गेले. गंगातीरी दोहीकडील फौजा होत्या. त्यांची लढाई मातबर होऊन मोगलाकडील फौज अगदी बुडविली. विठ्ठल सुंदर दिवाण, राजाबहादुर प्रतापवंत ऐसा किताब त्यास दिल्हा होता, तो लढाईमध्ये ठार जाहला. नबाब निजामअल्ली पंचविसा राबतांनिशी नदीमध्ये पडून पळून शाहार अवरंगाबादेस गेला. जाऊन शोक बहुत कष्टी होऊ लागला. शाहारचे लोक वरून दौलत बुडाली. म्हणोन नामे मातबर होते ते नबाबापास येऊन बहुत कष्टी विवेकाचा बोध केला. त्याजवरोन नबाबाने चित्ताचे ठाई विवेक करून राहिले. ते साल सन ११७३ अर्बा सीतैन मया व अलफ आशाढ वद्य आमावाशा. पुढे श्रावणमासी श्रीमंत यश घेऊन पुणेचे मुकामास आले. मंगळवेढेहून गोपाळराव यास नारो शंकर व बापूजी नंदे मध्यस्त यांनी घेऊन गेले. श्रीमंताची भेटी करून परस्परे बोलणेचालणे करारमदार पंचवीस लक्ष रुपयांचा जाहागिरी सरंजाम माहाममूलक नेमून दिल्हा. उभयपक्षी पूर्ववतप्रमाणे चालावे ऐसा ठराव करून मिरजेचा किल्ला हवाली दिल्हा. त्याअन्वये चालत असे- सन मारी कर्नाटक प्रांती हैदरखान सीरंगपटणचे राज्याकडील नूतन प्रतापी उद्भवला. त्याने त्या प्रांती बहुत उत्कर्ष करून ठाणी श्रीमंताचे तालुकियाची घेतली. त्याचे पारिपत्याविसी श्रीमंतांनी तमाम सरदारांस फौजबंदी करून आपण खास स्वारी सुध्दां तयारी करून मजलदरमजल त्या प्रांतास स्वारी जाऊन छावणी केली. सन मा ता सन ११७५, सबा सितैन मया व अलफ, तीन साल छावणी होऊन आपला मुलूख सोडून घेतला. फौजा मुलुकास अखेरीस आल्या. तदनंतर सन ११७६ साली कार्तिकमासी आणखी फौजबंदी करून, त्या प्रांती जाऊन, आणखी राहिली ठाणी त्याप्रो हस्तगत करून घेऊन, सालअखेरीस फौजा माघारे आपले ठिकाणास येऊन, चार मास राहून, मागती सन ११७७ पौषमासी त्या प्रांतास जाऊन, थोडे बहुत ठाणी हस्तगत करून घेऊन, सालअखेरीस देशास आले. सन ११७८ साली जानोजी भोसला याजमध्ये व श्रीमंतांमध्ये बेबनाव होऊन, फौज तमाम श्रीमंत माधवरावसाहेब समागमे घेऊन जानोजी भोसल्याच्या पाठीशी लागल्या. याजमुळे धांवणी बहुत जाहली. उभयतांचा विवेक होऊन जानोजी भोसला आपले ठिकाणी नागपुरी राहिला. श्रीमंत फौजेसह देशास आले. वैशाख शु।। पक्षी पुणेस दाखल जाहाले. लोक आपापले घरास निरोप देऊन वाटे लाविले. सन ११७९ कर्नाटक प्रांती आणखी फौजबंदी श्रीमंतांनी करून तमाम सरदार रवाना केले. सन म।। ता सन ११८१ अर्बा सबैन मया व अलफअखेर सालपरयंत छावणी करून, हैदरखानाची पारपत्ये करून सीरंगपटणापरयंत फौजा जाऊन पटण जेर केले. आपला मतलब सिध्य करून सालअखेरीस फौजा तमाम देशास आल्या.