Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

लेखांक १०२.
श्री.
१६७९ भाद्रपद वद्य ३.
चिरंजीव राजश्री समशेरबहादर यांसी-

रघुनाथ बाजीराऊ आशीर्वाद उपरी येथील कुशल जाणून स्वकीय लिहीत जाणे. विशेष. गोविंद बल्लाळ यांजकडून लाख रुपये तुमचे पथकास सालगुदस्तां तीर्थरूपांनी देविले आहेत. त्यास,मा रनिलेचे पत्र रा बाळाजी गोविंद हुजूर आले. त्यांणी तीर्थरूपाचे वरातेप्रो लाख रु द्यावे ऐसा करार केला. त्यापैकी रा गोविंदराव महादेव, तुमचे निबसतीचे गोविंद बल्लाळ यांजकडे चाकरीस होते, त्यास नालबंदी समजाविशीचे ऐवजी पन्नास हजार रुपये देणे. पन्नास हजार रुपये राहिले. ते दोन महिन्यांत बाळाजी गोविंद यांजपासून घेणे. सदरहूप्रमाणे लाख रुपयांचा भरणा करून घेऊन कबजा लाख रु पावले म्हणोन लिहून देणे. दोन महिन्यांत झाडा करून घेणे. र।। छ १६ जिल्हेज, सु। समान खमसैन मया व अलफ. बहुत काय लिहिणेॽ हे आशीर्वाद.

लेखांक १०३.
श्री.
१६७९ भाद्रपद वद्य ४. राजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसी-

विनंति उपरी. तोफखान्याकडील जिन्नस आणावयाबद्दल तुम्हांकडे पाठविले आहेत. यांस रोजमुरा दीडमाही रु।।
१० शामजी हरि कारकून रुजू धोंडो मल्हार कारकून रु १०
११ जासूद जथे येसाजी नाईक ६ बिरुजी सटवाजी
५।। राणोजी एसाजी
-------
११।।

-----
२१।।

येणेप्रमाणे साडेएकवीस रुपये देविले आहेत. छ १ मोहरमी देणे. पुढे राहिले तरी दीडमहिना जाहलियावर दुसरा रोजमुरा देणे. आणि मशारनिलेबद्दल सामान जलदीने पाठविणे. रा छ १७ जिल्हेज. सु।। समान खमसैन मया व अलफ. लेखन सीमा. बार.