Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

लेखांक ८७.
श्री.
१६७६ भाद्रपद शु।।१०. अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री बाळाजी गोविंद क।।दार, पा डेरापूर वगैरे गोसावी यांसी-
सेवक रघुनाथ बाजीराऊ नमस्कार. सु।। खमस खमसैन मया व अलफ. शिवराम देवजी, दिमत अहमदखान पठाण, यांस प्रो अंतर्वेद येथील ऐवजी सन इसन्नेत राजश्री मल्हारजी होळकर व जयाजी शिंदे यांणी समाईक ऐवजी रु ।।३०० तीनशेंची असामी दिली होती. त्यास, हाली वाटणी जाहली. सा उभयतां सरकारतर्फेने रुपये १०० शंभर रुपये करार देविले असेत. पामजकूरचे ऐवजी पाहते करणे. जाणिजे. र।।छ ८ जिल्हाद. आज्ञाप्रमाण.


लेखांक ८८.
श्री.
१६७६ भाद्रपद शु.।।११. राजश्री गोविंद बल्लाळ गोसावी यांसी-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य रो मल्हारजी होळकर दंडवत विनंति. सु खमस खमसैन मया व अलफ. शिवराम देवजी यांसी नबाब अहमदखान पठाण यांसी असामीमुळे रु तीनशे करार केले. त्यापैकी आम्ही आपल्या हिशाचे रु ।। १०० शंभर तुम्हांकडून अंतर्वेद महाल ऐवजी देविले असेत. साल दरसाल पावीत जाणे. छ ९ जिल्काद. बहुत काय लिहिणेॽ हे विनंति.