Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

लेखांक ८३.
श्री.
१६७४ वेदशास्त्रसंपन्न राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी-

विद्यार्थी बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय लिहिणे. विशेष. तूर्त ऐवजाची निकड सरकारांत आहे. म्हणोन पूर्वी पांच लक्षांची तरतूद करावी, याविशी पत्र तुम्हांस लिहून पाठविले होते. तुमचा जाबही आला होता की, तूर्त गडबड आहे, ऐवज सावकारियांत मिळत नाही. म्हणोन पूर्वी तुमचा जाब आला होता. ऐशास, प्रस्तुत गडबडही वारली आणि ऐवज पोटास पाहिजे. रु।। करितां पत्र लिहिले आहे. तर शहरात सावकारांकडे तजवीज करून पांच लक्षांची तर्तूद होऊन येई ते करावे. बहुत काय लिहिणेॽ हे विनंति.

लेखांक ८४.
श्रीरामचंद्र.
१६७४ श्रावण वद्य १२. राजश्री विसाजी गोविंद गोसावी यांसी-

अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो दमाजी गायकवाड समशेरबहादूर दंडवत. सु।। सलास खमसैन मया व अलफ. तुम्हांपासून कर्ज घेतले त्यापैकी आलाहिदा दिल्हे असे. त्यांजपैकी देणे. सिलेदार फुट असामी याबाबत नालबंदी रु
१५० खंडो शामराव कारकून नि।।
परदळे १५० दीडसे.
१४० निंबाजी सातभाई.
-----------

२९०
सदरहू दोनसे नव्वद रुपये देविले असत. आदा करून पावलियाचे कबज घेणे. जाणिजे. र।। छ २६ सवाल. बहुत काय लिहिणेॽ हे विनंति. मोर्तबसूद. बार. (श्रीमार्तंडचरणी तत्पर! पिलाजीसूत दमाजी गायकवाड निरंतर।।)