Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

लेखांक ७८.
श्री.
वेदशास्त्रसंपन्न राजमान्य राजश्री दीक्षितबाबा स्वामीचे सेवेसी-

सेवक जगदेवराऊ सिंदे कृतानेक साष्टांग दंडवत विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन करीत असावे. यानंतर सरकारचे तर्फेने आनंदराऊ राजाराम औरंगाबादेत असतात. सर्व आपणास अवगत आहे. त्यास, देवकीनंदन गोपीनाथ याबाबत बारा हजारांच्या हुंड्यांबाबत पेशजी कजया जाहला होता. हुंडीचे रुपये बाजवी असतां द्यावयास दिकत करूं लागले. म्हणोन सविस्तर वर्तमान श्रीमंत स्वामीस विदित करून तेथून पत्रे नवाब दरगाकुलीखान यांस आणिली. तेव्हा रुपये हुंड्याप्रमाणे घेतले. असे असोन आता मागती आकस करून देवकीनंदन गोपीनाथ जमाखर्च करून पैसा देत नाही, आणि सर्व सराफ अकसीने फिरोन कजिया करितात, म्हणोन विदित केले. त्यावरोन आपणास पत्र लिहिले असे. तरी आपण प्रसंगी असोन वारंवार कजिया होय, ऐसे नसावे. जबरदस्ती कोणी करीत नाही. येविशी जेपूरहून त्याचे धन्याचे पत्र व उज्जैनकराचे पत्र आहे. त्याप्रमाणे वर्तणूक व्हावी आणि पैसा घ्यावा. येविशी दिकत करील तरी आपण नबाबास व देवकीनंदन गोपीनाथ यास उत्तम प्रकारे ताकीद करून सांगावे. नबाबास सांगावे की श्रीमंताचे पत्रावरून रुपये दिले असतां वारंवार कजिया होतो, उत्तम नाही. ऐसे असोन फिरोन पंचाईत करणे असेल तरी त्यास पुणियास पाठवून द्यावे. येथून कारकून सरकारचा राजश्री कृष्णाजी गोविंद व स्वार १५ पाठविले आहेत. नबाबास सांगून पैसा देवावा आणि जमाखर्च करवावा. नाही तरी जे कजिया करतील त्यास पुणियास पाठवून दीजे. राजाराम नाईक यांस श्रीगोंद्यापावेतो समागमे घेतला असे. आपण वडील तेथे आहेत येणेकरून चिंता नाही. सदैव पत्री संतोषवीत असावे. बहुत काय लिहिणेॽ लोभ असो दीजे. हे विनंति.