Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड अकरावा ( १६९१-१७६०)
लेखांक १००.
श्री.
१६७९ भाद्रपद वद्य ९. कदाचित निजामअल्लीखान येथे आला तरी तिकडीलही सूत्र हाती असावे यास्तव तिकडीलही सूत्र हाती असावे यास्तव तिकडीलही सूत्र राखिले आहे. राजश्री विठ्ठल सुंदर नवा दिवाण केला. त्याचेच मसलतीने इभराईखान गाडद्यास चाकर ठेवीला व इकडील यावयाचा कस्त केला आहे. त्यास राजश्री विठ्ठल सुंदर यांस मी पत्र लिहिले होते. त्याचे उत्तर आले तेही बजिन्नस हजूर पाठविले आहे. याहून अर्थ ध्यानास येईल. येथे ... आल्यावरी जरा काबू पा............ इभराईमखानास लिहून मजपाशी पाठविले पाहिजे की ते येताच, त्यांची भेटी होतांच प्रसंगानुसार कार्यास येतील व याचे मसबदेही मजला मजकूर काढावयासी पाठविले पाहिजेत. मी आपले आपल्या बुध्दीप्रमाणे विनंति लिहिली. याहीवर स्वामीची मरजी.
लेखांक १०१.
श्री.
१६७९ भाद्रपद वद्य ३.
राजाश्रियाविराजित राजमान्य राजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसी-
पोष्य रघुनाथ बाजीराऊ नमस्कार विनंति उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय लिहिणे. विशेष. रा त्रिंबकराव शिवदेव यांजकडे सरकारचा हत्ती होता तो मेला. सबब तुम्हाकडून हत्ती नग १ एक देविला असे. तरी मेणपुरी बाबत हत्ती तुम्हाकडे आहे तो देऊन पावलियाचे कबज घेणे. जाणिजे. र।। १६ जिल्हेज, सु।। समान खमसैन मया व अलफ बहुत काय लिहिणेॽ हे विनंति. बार.