Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक ८६.

श्री नकल.
१६९५ पौष वद्य १

याद. राजश्री बाळाजी नाईक भिडे यांचा हिशोब एकंदर, सु। अब सबैन मया व अल्लफ, माहे रमजान, अखेर मार्गशीर्ष पावेतों सरकारचा शिक्यानशीं दिल्हा. त्याजशिवाय मारनिलेचें देणें तफावत कलम रुा
३०००० कित्ता रकमा.
१५००० सन इसन्नेंत सरकार भरण्यास नाईक मारनिले व नारो आपाजी व रामचंद्र नाईक परांजपे यांजकडून रुपये ५००००० पांच लक्ष देविले. त्यापैकी रद्कर्ज हुंड्या परभारें दिल्हे ४८५०००. बाकी
देणें रु।
१५००० दरबारचा खर्च व शिलेदाराचे समजाविशी बा व गैरे हिशेब रुा २२६५६७॥• पैकीं भरणा परभारा २११५६७|||• बाकी देणें
-----
३००००
२००० त्रिंबकराव हरी परचुरे यांणीं बंदर सुरतची मामलत करून रसदेचा भरणा केला असतां, त्याजकडून मामलत काढून रसदेचा ऐवज घेतला; तो माघार दिल्हा. सा खर्चाचे रुपये मारिनलेस देणें पडिले,
ते रुा १५२५ माहाल मार कमाविसदार व कारकून याचे मुशाहिरे देणें पडिले ते रुा ४७५ व्याजावा.
----
३२०००
सदरहू बत्तीस हजार रुपये पेशजींचे हिशेबाशिवाय मारनिलेचे देणे. शिवाय व्याज सदरहु ऐवजाचे मित्या पाहून देणे असे. जाणिजे. छ १५ माहे सवाल.