Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ८५
श्री.
१६९५ आषाढ-श्रावण
श्रिया सहस्रायु चिरंजीव राजमान्य राजश्री भाऊ यांसीं प्रति काशीराव भास्कर आशीर्वाद उपरी येथील कुशल जाणून स्वकीय लेखन करीत असिलें पाहिजे. विशेष. तुह्मांकडून पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं. तरी ऐसें न करावें. सदैव पत्रीं कुशलार्थ लिहित जाणें. यानंतर इकडील अर्थ तरीः चिरंजीव रा तात्या, श्रीमंत मातुश्री दर्याबाईसमागमें श्रीमंत आपासाहेबांसहित आहेत. आकोटावर आले. इस्माईलखान अलजपुरास आहेत. श्रीमंत नानासाहेब व नबाबाचे दिवाण रुकनद्दौला व जंग व धौसा ऐसे मिळून पंधरा हजार कंबेश फौज, शिवाय पन्नास साठ तोफा, शिवाय जेजाला, बाण व गारदी ऐसे सामानानशीं नजीक अलजपुरास गेले. पाहावें. इस्माईलखान जुजावयासी लागेल. शहरांतून लागले तरी आपा बाहेरून लाग करतील. नाहीं तरी, इस्माईलखान याचे विचारें जावसाल होणें तो होईल. ह्या आठ दिवसांत हरएक गोष्ट घडते, ऐसें आहे. आह्मी उभयतां श्रीमंताचे कटाक्षामुळें बेसरंजामीस्तव घरींच आहों. चिरंजीव तात्या मातुश्रीचे मर्जीत सुखरूप आहेत. चिंता न करावी. बहुत काय लिहिणें हे आशीर्वाद.