Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ८२.
श्री. (नकल)
१६९४ फाल्गुन शुद्ध १
शिक्का.
आज्ञापत्र समस्त राजकार्य धुरंधर विश्वासनिधि राजमान्य राजश्री नारायणराव पंडित प्रधान ता, कादरखान वल्लद सादुल्लखान वा कसबें वाई समत हवेली प्रांत वाई. सुा सलास सबैन मया व अल्लफ, तुह्मीं हुजूर पुणें येथील मुकामीं येऊन विदित केलें कीं, कसबें मार येथील कोतवाली पेशजीपासून आपला आजा मियानखान त्याजकडे होती, तो हल्लीं मयत झाला, याजकरितां साहेबीं कृपाळु होऊन आपल्याकडे कोतवाली करार करून सनद करून दिल्ही पाहिजे. ह्मणोन त्याजवरोन मनास आणितां, का मारिची कोतवाली तुझा आजा मियनखान त्याजकडे चालत होती. त्यास, तो मयत जाहला. सबब हल्लीं तुजकडे कोतवाली करार करून दिली असे. कोतवाली संमंधें जमीन मळ्यासुद्धां व हक्कलाजिमा, सुदामत चालत आल्याप्रमाणें दुवा घेत जाऊन पूर्ववत्प्रमाणें कोतवालीचें कामकाज करीत जाणें, जाणिजे. छ २९ जिलकाद. आज्ञा प्रमाण, लेखनसीमा, मोर्तब.