Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक ८८

श्री.
१६९५ फाल्गुन शुद्ध १२

राजश्रियाविराजित राजमान्यराजश्री नरसिंगराव स्वामीचे सेवेसीं:-

पो सखाराम भगवंत साष्टांग नमस्कार विनंति उपरी येथील कुशल जागून लिहित जावें. विशेष, राजश्री विष्णु नरहर लष्करांतून आले. त्यांणी सविस्तर मजकूर सांगितला तो कळला. त्यास तुमचें लक्ष इकडचें पुरतें आहे व हाली मारनिले यांणीं खातरजमा केली. त्यास, राजश्री भवानराव प्रतिनिधी व राजश्री वामनराव गोविंद हे उभयतां तुह्मांस सांगतील त्याप्रों ते व तुह्मी मिळोन कर्तव्य तें करावें. सर्व गोष्टी तुह्मांस समजल्याच आहेत. मेहनतीचे, कारस्थानीचे दिवस हेच आहेत. सर्व एकदिल होऊन कर्तव्यार्थ करावी. रा छ ११ जिल्हेज. बहुत काय लिहिणें. लोभ असों दीजे. हे विनंति.