Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक ८३

श्री
१६९५ भाद्रपद वद्य अखेर.

श्रीमंतास पत्र लिहिलें आहे त्यांतील अन्वय.

विशेष. स्वामीनीं आज्ञापत्र पाठविलें तें सादर जाहालें. छ ११ जमा दिलाखरीं दोन प्रहरां दिवसानंतर गाडद्यांची तलबेमुळें दिवाणखान्यांत कटकट जाहली. त्यांत नारायणराव मारले गेले. त्यास, तुह्मीं किल्ले मजकूर येथील चौकशी पाहारियाचा बंदोबस्त चांगला करणें, तिकडे तुह्मांस शत्रू संनिध. ते आपली संधी पाहत असतील, याजकरितां बातमी राखोन बहुत खबर ( दार ) राहणें ह्मणोन आज्ञा. त्यास आज्ञेप्रमाणें किल्याचा बंदोबस्त यथास्थित राखला आहे. सांप्रत, नबाब हैदरअल्लीखान पट्टणासच आहेत. चित्रदुर्गकरांकडे जमाव पाठविला होता. त्यास, तेथील तह करून जमाव पट्टणास आणविला.........जागा कोडगाकडे वगैरे जमाव पाठविला होता. सर्व...पट्टणास जमा केला आहे. विजयादशमी जाहल्यावर चंदावरची कुमक करणार ह्मणोन बातमी आली आहे. याउपरी काय मनसबा करतील कळत नाहीं. वातनीस नेहमीं पांच जोड्या पाठवून वरचेवर बातनी आणवित असतों. त्याचा उपद्रव इकडे द्यावयाचा डौल दिसोन आलिया ठाण्याच्या बदोबस्तास शिबंदी जाजती ठेवावी लागेल. गुदस्तां नबाबांनीं श्रीनिवासराव बरकी फौजसुद्धां पाठवून पुंगनुर व घटक वगैरे तालुक्या खालील पाली येथील खंडणी तीसाला करून ऐवज घेऊन गेले. व गुमनाड पालें घेऊन, तेथें ठाणें आपलें घालून, चिमणाजी बाळाजी यांस ठेऊन, तेथें पांचशें स्वार व पांचशें गारदी ठेविले आहेत. त्याचा उपद्रव तालुक्यास होत आहे. इकडे आरद्राचा परज्यने जुजबी पडला होता. शेतें पेरलीं होतीं. मध्यें परज्यने पडला नाहीं याजमुळें वाळून गेलीं. कार्तिकांत साळीचें पीक यावें तें बुडालें हल्ली हस्ताचा परज्यने लागला आहे. स्वामीचे पुण्यप्रभावें (पीक) सर्व तालुक्यांत होईल. वैशाखचें साळीचें पीक होईल. नबाब महमंद अल्लीखान यांणीं चंदावरास मोर्चे देऊन तें स्थळ घेणार. धर्म–संस्थान आहे. स्वामीच्या पुण्यप्रतापें राहील. कळेना. येंदा फौजा याप्रान्तीं आल्या तर प्रांताचा बच्याव आहे. वरकड वर्तमान राजश्री रामचंद्र माहादेव शेवेसीं विनंती. (कर) तां निवेदन होईल.