Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक ८४

श्री.

यादी बळवंतराव महादेव भानु. विज्ञापना. आमची बहीण कैलासवासी श्रीमंत भाऊ साहेब यास प्रथम संमंधास दिल्ही होती. सबब सरकारांतून आह्मांस तो बेलापूर येथील दिवाणागिरीची असामी दरकी अडीच हजार रुपये यांची कैलासवासी श्रीमंत नानासाहेब यांणीं करार करून दिल्ही. ती आजपर्यंत निर्वेध चालत आली. ती स्वामी कृपाळू होऊन, असामी पूर्ववत आह्मी सरकारचे पदरचे, आमचें चालवणें अवश्यक जाणोन, असामी चालविली पाहिजे.