Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक ६५१

श्री.
१७२५ पौष शुद्ध ४

विज्ञापना ऐसीजे. इंग्रजांचीं व यांचीं बोलणी होऊन निश्चयांत आली.
* कलमें विा-

वरधेपलीकडे जो प्रांत तो तुम             कटक व वराड आह्मीं घेतलेच आहे
चा तुह्मांकडे असावा कलम १.            ते माघारें द्यावयाचें नाहीं. कलम १.
मंडले संस्थानाविशींचे आह्मी               गावेलगड व नरनाला यांचे सरंबोललो
असतो. परंतु तुह्मीं राजश्री                  जामाचा प्रांत इतकें तुम्हांस दिल्हें.
पंतप्रधान यांची नुकसानी केली            हे तुह्मांकडे असावे. १.
नाहीं. सबब तेहि तुह्मांकडे असावे १     आमचे द्वेषी असतील त्यांची
फरासिस अथवा इंग्रज कोणी तु.          साथ तुह्मीं करू नये. कलम १.
सांपाशी आल्यास त्यास नोकर ठेऊ      आमचा वकील तुह्मांपाशी व तु
नये. कलम १.                                  मचा आह्मांपाशी असावा. कलम १.
आह्मांवितिरिक्त राजकारण कोणीकडे
तुह्मीं ठेऊ नये. कलम १.

सदर्हूप्रमाणें निश्चयांत आलें, ऐसें ऐकिलें. त्याजवरून विनंती लिा आहे. याशिवाय आणखी काय असेल तें समजेल तसें लिहून पाठऊं. शेवेसी श्रुतहोय. हे विज्ञापना.