मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक ६३५

श्री.
१७२४

यादी गुलाम बदीयुदीखान किल्ले पेमगिरी. आमचे सरंजामाचे गांव च्यार गुदस्तां सरकारांत घेतले. याजमुळें खर्चाची वोढ जाहाली, किल्ले दोन स्वाधीन आहेत. होळकराकडील फौज किल्वानजीक आली. कोणे समईं कसा प्रसंग येतो, याचा भरवसा नाहीं. खर्चावांचून किल्यांतील लोक हवालदील. खर्चाची तारांबळ. याजकरितां सेवेसी विनंतीपत्र पाठविलें. त्याजवरून, गांवाविशींचा मजकूर राजश्री चिंतापंत यांजपाशीं बोलावा, म्हणून आज्ञा जाली. नंतर देशमुख यांणीं राजश्री भाऊ सरंजामी यांस बलावून आणून, सरंजाम पौ किल्याकडे नेमणूक काय व जातीकडे किती, याची चवकशी केली. जातीस व किल्यास मिळोन वरात सरंजाम गांव मोघम आहे. आमचे वडिलांकडे मोंगलाईंतून सदरहू सरंजाम व किल्ले होते. ते अल्लीबाहादूर यांचे मातोश्रीचें लग्न जाहालें, तेव्हां सदरहू सरंजाम व किल्ले सरकारांत दिल्हे. नंतर सरकारांतून किल्ले पेमगिरी व सोनगड दोन किल्ले व सरंजाम गांव व इतलाख वरात मोघम आमचे वडिलांस दिल्हेत. आजपर्यंत सरकारांतून कृपा करून चालविलें. त्याप्रों साहेबांनी कृपा करून गांव आमचे आह्मांकडे देववावयाची आज्ञा होऊन पूर्ववतप्रों चालविलें पाहिजे.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries