Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक ६१२

श्री.
१७२४ कार्तिक शुद्ध ९

राजश्री नारायण राव गोसावी यांसी:-

अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो बाबूराव आंगरे वजारतमाब सवाईसरखेल रामराम विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित असावें. विशेष, राजश्री येशवंतराव होळकर यांसी लढाई जाल्याचा मजकूर परस्परें तुह्मांस समजलाच असेल. फौजेंतील सरदार उपाय नाहीं तेव्हां निघाले. नंतर आह्मीं पांच चार स्वारानसीं निघोन छ ३ मीरहूस जजीरे कुलाबा येथें येऊन दाखल जालों, राजश्री राऊ पंडितप्रधान घाटं उतरून कोंकणांत आले. समागमें तुह्मी आहां ह्मणोन समजल्यावरून, येथून राजश्री दिनकर नारायण याची रवानगी केली आहे. येऊन तुह्मांजवळ बोलतील. राजश्री राऊपंडित यांसी विनंति करून, पुढें कर्तव्य असेल तसें लिहिण्यांत यावें. सरकारचाकरीस सिद्धच असों. रा छ ७ माहे. रजब, बहुत काय लिहिणे? लोभ कीजे हे विनंति. मोर्तबसुद. ( शिक्का, )