Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक ६११

श्री.
१७२४ कार्तिक शुद्ध १

राजश्री नारायण रावजी वैद्य स्वामीचे सेवेसी:-

पो सदाशीव रंगनाथ वानवळे सां। नमस्कार विनंति येथील कुशल, ता। का शु। १ बुधवार मुा। चिखलगांव, नजिक किल्ला रोहिडा, येथें स्वस्तक्षेम असों विशेष. गांवांतून स्वारी निघाली तें समईं घरीं भोजन करीत होतों. नंतर निघोन स्वारी टेंकडीवर होती तेथें आलों. नमस्कार करून पाठीमार्गे टेकडीखालें उभा होतों. तेथें गडबड जाली. सा।, मागें अंबराईंत आलों. तेथें उभा होतों. तों तेथें रा। श्रीपतराव मैराळ व राजश्री दाजीबा आले. त्यांणीं सांगितलें, येथें उभें राहूं नये, मागें गर्दी जाली. मी श्रीमंताजवळ होतों. स्वारी तेथून निघाली. कोणाकडे गेले हें समजलें नाहीं. तुह्मी येथें उभे राहूं नका, आमचे बराबर चला. ते व मी दोन कोस बराबर होतों. पुढें त्यांची आमची चूक पडली. आह्मीं सोमवारीं रात्रीं तोरणा किल्यानजिक किल्यांत राहिलों. तेथून दुसरे दिवशीं आंबवड नागनाथाचे येथें आलों. तेथून आज बुधवारीं मु। मारीं येऊन, एका ब्राह्मणाचे घरीं राहून, श्रीमंत यजमान साहेबांस विनंति लिहिली व आपल्यास हें पत्र लिहिलें आहे. तर, स्वारी कोठें आहे हें कळावें, म्हणजे सेवेसीं येऊन पोहोंचतों. वेळेस तेथें गडबडीमुळें स्वारी अंतरली. त्याणें अशा फे-यांत पडलों. जवळ पाणी पिण्यास पात्र देखील नाहीं, अशी अवस्ता आहे. तर, देखतपत्र उत्तर यावें, जेथें आपण व श्रीमंत माहाराज यजमान साहेब असतील, तेथें येतों. बहुत काय लिहिणें? लोभ असों दिजे. हे विनंति.