Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ५९८
श्री. (मसूदा)
१७२४ भाद्रपद शुद्ध ८
जगंनाथपंत यांचे नांवें पत्र पाटणास लि। दिल्हें.
विशेष, सीतलगीर गोसांवी का। पाटण येथें राहत होता. त्यास सागरवाले याणीं संस्थान घेतलें त्यावेळेस गोसावी मजकूर परागंदा होऊन श्री काशींत वीसचवीस वर्षे राहिले. हालीं संस्थान सागरवाले यांजकडोन राजश्री सेनासाहेबसुभा यांजकडे सरकारांतून देविलें. तेव्हां पाटण माहाल सरकारांत ठेविला. हें वर्तमान गोसावीमार यानें आइकिलें. त्याजवरोन काशीहून निघोन पाटणास तुमची भेट घेऊन आला. यासी, येऊन आह्यांस भेटला. आपलें वर्तमान सांगितलें. त्यावरोन गोसावी तेथील स्थाईक आणि सरकार, उपयोगी, तेथें राहिल्यानें हरएक कामीं पडतील, ऐसें जाणोन, गोसावीमार याची खातरी करून तुह्मांकडे पाठविला आहे. त्यास का पाटण येथें
१ का मारीं मठ बांधावयासी जागा नेमून द्यावी. महिना पंधरा दिवस दाहा पांच बेगारी लागल्यास द्यावे. याचें बोलणें कीं, तीन बागा कसब्यामध्यें आपले गुरूच्या हातच्या आहेत. त्यांची चौकशी करून त्यांतील एक बाग यांस द्यावा. गरीबगीर गोसावी याचा मोठा बाग द्यावा. कलम १.
१ पो। मारीं गोसावी याची सावकारी बीज व नगदी वगैरे येणें आहे. त्यास, रयत रजावंतीनें सरकार-नुकसान न होतां, जसें ज्यापाशीं निघोन असामी कायम राहील, अशा त-हेने हे मागतील. येविसीं तुह्मीं ताकीद रयतेस वगैरे करावी.
१ वस्तींत राहिल्यानंतर नवी देवघेव करितील, येविशींचा तुमचा पक्ष असावा.
१ गोसावीमजकूर कसब्यांत मठ बांधन राहणार, तेव्हां दाहा पंचवीस याजपाशीं अतीत राहातील. त्यांचा योगक्षेम चालला पाहिजे, व सरकारचे उपयोगाचे आहेत, याजकरितां यास पड जमीन पडली आहे. त्यापैकीं तीनशां रुपयांची कामारीं अगर हरएक गांवीं पाटणचे माहालांत चला बांधोन सरकारची सनद करून द्यावी.
१ गोसावीमार तेथें राहणार, तेव्हां याचे किती ब-यावर व किती वाईटावर असतील. याचें लक्ष तुह्मीं ठेऊन, हरएकविसीं याची गौरसी करीत जावी. सदरहू कलमें ५. गोसावीमार तुह्मांजवळ आल्यानंतर लिाप्रों त्याची खातरी करून याचा पुस्तपाना करीत जावा. फिरोन बोभाट येऊं न द्यावा, रा छ ७ जावल, सुा। सलास मयातैन व अलफ.