Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक ५७६

श्री.
१७२४ ज्येष्ठ शुद्ध ४

राजश्री नारायण बाबूराव स्वामी गोसावी यांसीः-

विनंति उपरी. तुह्मीं छ २ सफरचें पत्र पाठविलें तें पावलें. येशवंतराव होळकर याची चाल हिकडे, याप्रों वर्तमान चहूंकडून आहे. येविशींचा विचार करणार स्वामी समर्थ आहेत, ह्मणोन लिहिलें. त्यास, या मजकुराचें रा। बाळोजी कुंजर यांजकडून काल पत्र आलें, त्याचें उत्तर सविस्तर लिहून पाठविले आहे. त्यांत तुह्मांस व रा। निंबाजी भास्कर यांस घेऊन विचार करावा. असें लिहिलें आहे. तें तसेंच करतील. दुसरा मजकूर तुह्मीं नाजुक लिहिला व नांवनिशीची याद अलाहिदा पाठविली ती पावली. संगतवार मजकूर चांगला लिहिला तो हुजूरचेहि मनास प्रशस्त वाटला. नांवनिशीं लिहिली त्यांत एकाधे ठिकाणीं एकाधा गुण मिळतो, एकाधा मिळत नाहीं. यांजकरितां आणखी नांवें, बावास व तुह्मांस सुचतील तीं या कामास योग्य अशा माणसांची लिहून पाठवणें. जाणिजे, छ ३ सफर, हे विनंती.
पो छ ४ सफर ज्येष्ठ शुद्ध ६ शुक्रवार शके १७२४