Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक ५८०

श्री
१७२४ ज्येष्ठ शुद्ध १३

वेदमूर्ती राजमान्य राजश्री हरभटबाबा व सखारामभट स्वामीचे सेवेसी:-

सेवक रामराव बगाजी कृतानेक सां। नमस्कार विनंती उपरी येथील कुशल ता। ज्येष्ठ शुद्ध १३ मुकाम लष्कर नजीक पुण्यस्तंब जाणोन स्वकीय कुशल लेखन करीत असिलें पाहिजे. विशेष. ( सर ) कारी फौजा गंगातीरीं आल्यामुळें तिरस्थळीचे ब्राह्मण बहुत भयाभीत जाहले आहेत. त्यावरून पत्र पाठऊन, क्षेत्रींचे ब्राह्मणांची खातरजमा करून, फौजेकडील सरदारांकडूनही कोणेविशीं उपसर्ग न लागे, तो अर्थ करावा. म्हणोन विस्तारें लेखन केलें. त्यावरून राजश्री फत्तेसिंगराव माने यांजली पेशजीं सांगून खातरजमाचीं पत्रें दिल्हींच होतीं. हालीं आणखी सांगून सरकारीपत्र व कोणी हरामी यांचे नांवें चिठी असें पाठविले असेत. येथूनही ताकीद करावयाची तितकी करीतच आहोंत. सरकारीपत्र तुमचे क्षेत्राचे नांवें व स्वारप्यादा यांचे नांवें ताकीदपत्र दिल्हें आहे. तें ठेऊन घेऊन, जो कोणी येईल त्याजला दाखऊन, आपले जवळ ठेवींत जावें. उपद्रव लागणार नाहीं. येविशीं रा। बाजीकडीलही ताकीद आह्मांस पहिल्यापासून आहे. परंतु आमचें चालेल तेथवर आळस होणार नाहीं. आपलेंही सर्व ध्यानांतच असेल. बहुत काय लिहिणें ? लोभ करावा हे विनंती.