मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक ५७४

श्री
१७२४ वैशाख.

विशेष. आपण खासा स्वारी, फौजसुद्धां, खानदेश प्रांतीं आल्याचें वर्तमान ऐकून बहुत संतोष जाहला. पुढें राजश्री फत्तेसिंगराव माने वगैरे फौजा या प्रांतीं रवाना जाल्या. जनवार्ता सैन्याचा उपद्रव. याजमुळें तिरस्थळी क्षेत्रस्थ ब्राह्मणांस भय उत्पन्न जालें. सालगुदस्ता क्षेत्र कायगांव पेंढारी यांनी लुटले. त्या भयामुळें अधिक भय प्राप्त जालें ! परंतु फत्तेसिंगराव माने क्षेत्र पुणतांबें येथें आले. त्या मुकामीं त्र्यस्थळीं क्षेत्रस्थ ब्राह्मण श्रीफल घेऊन गेले. त्यांनीही अभय दिल्हें जे, आह्मांस येविशींची सुभेदारांची आज्ञा आहे जे, क्षेत्रास उपसर्ग देऊं नये. त्याजवरून सर्वांस संतोष जाला. हालीं नबाबअमीरुद्दौलाबहादुर फौजेसुद्धां का नजीक कायगांव गांडापूर येथें आले. त्याजकडीलही किमपि उपसर्ग क्षेत्रास लागला नाहीं. त्याजवरून माने यांचें सांगणें पडलें त्याप्रों ताकीद आहे, हें सर्वांस अनुभऊन संतोष जाला, तो पत्रीं कोठवर ल्याहावा ? पूर्वापार आपले सरदारीXत या संस्थानचा अभिमानच आहे. तदनुसार हालीं आपणासही अभिमान आहे, हें दृष्टोत्पत्तीस आलें. या संस्थानाकडे पा। गांडापूर पो। कायगांव व काठेपिंपळगांव व कसबें सातारें पा मार व मौजे जोळकें पा नेवासें हे चार गांव सदावर्ताबद्दल इनामी आहेत. त्यास, साहा वर्षें या प्रांतीं शिंदे वगैरे फौजा होत्या. त्याचे उपसर्गामुळें एक पैसा नाहीं, सालगुदस्ता शिंदे हिंदुस्थानांत गेल्यापासून कांहीं वस्ती जाली. प्रस्तुत अमीरुद्दौलाबाहादर पो आंबड येथें गेले. त्यांचे मागें ठाणें बिडकी किनगांवींहून ठाणेदार यांणी सातारेयास चिठी पाठविली जे, मौजे कायगांव व सातारे दोन्ही तनखा दिल्ही आहे, त्यास कमरखुलाई व मसाला ६०० रुपये देऊन जाबसालास येणें. त्याजवरून अमीरुद्दौला याजकडेही कोणी बोलण्यास पाठविले आहेत. बहुतकरून आपली सख्त ताकीद आहे त्याजवरून निवरण होईल. परंतु वारंवार उपद्रव लागतात, त्याचा विस्तार पत्रीं काय लिहावा ? सा, रा। फत्तेसिंगराव माने व अमीरुद्दौला यांस व आणखी पागे व पथके यांस सदरहूप्रों निक्षून ताकीदपत्र असल्यानें ठीक पडेल, पूर्वीपासून या संस्थानाचा अभिमान आपले सरदारींत आहे. त्याप्रों आपण चालविल्यास श्रेयस्कर आहे. एक अभयपत्र तिरस्थळी क्षेत्रस्थ समस्त ब्राह्मणांस असावें.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries