Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक ५७७

श्री.
१७२४ ज्येष्ठ शुद्ध ११

वेदशास्त्रसंपन्न राजमान्य राजश्री नाना दीक्षित स्वामीचे सेवेसी:-

विद्यार्थी धोंडो बाजीराव कृतानेक सां। नमस्कार विज्ञापना येथील कुशल ता। ११ माहे सफर पर्यंत यथास्थित असे. विशेष. येथून सडी फौज तयार होऊन पठाण नि। होळकर यांचे फौजेवर गेली. यांची त्यांची लढाई जुंपली आहे. श्रीहरी कृपा करून यश येईल तेव्हां खरें, परंतु फौजेस खर्चास पाठविलें पाहिजे. याजकरितां रोजगुदस्तां शिदूजी पा आपणाकडोन येथें आलें होतें, त्याशींहि समक्ष बोललों होतों. त्याणीं आपणास निवेदन केलेंच असेल. अणि विनंतिपत्र लिहिलें आहे. तरी, कांहीं ऐवज पाठऊन द्यावा, एथें ऐवज येऊन दाखल जाहल्यास चिठी लेहून पाठऊं. परंतु, या प्रसंगी स्वामी महाराजांनी आनमान केल्यास आपल्यास युक्त दिसणार नाही. भरवंसा जाणून विनंतिपत्र लिहिलें आहे. अव्हेर न करितां पांचहजार पर्यंत सरबाई करून पाठवावी व गांडापूरचे वाणीउदमी निघोन कायगांवास आले आहेत. त्यांस ताकीद करून येथें पाठऊन द्यावें. आणि कांही दोन खंडीची कणीक व दाहा पंधरा मण तांदूळ व डाळ तुरीची एक खंडी व तुपाच्या जोड्या एक दोन बैलांवर घालून पाठऊन द्यावे. येविशी तिळमात्र आणमान होऊं नये. तेथून सरंजाम न आल्यास कायगांवास येईल. नंतर आपण दोष ठेवितील. जाणून सरंजाम जलद पाठऊन द्यावे. व ऐवजावीशी अनमान न करितां ऐवज हरतरवीज करून पाठऊन द्यावा. या प्रसंगास सरबराई केलि. यास. तीर्थस्वरूप राजश्री मलबादादा याजवर बहुत उपकार आहे. शेवेसी श्रुत होय. हे विज्ञापना.