मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक ५७१

श्री.
१७२४ वैशाख अखेर

वेदशास्त्रसंपन्न राजमान्यु राजश्री दीक्षित बाबा स्वामीचे सेवेसी:-

रमाबाई जाधवराव दंडवत विनंति उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहित असिलें पाहिजे. विशेष, बहुत दिवस जाले. पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं. त्यास, ऐसें नसावें. सदैव येणाराबराबर पत्रद्वारें आनंदवीत असावें. यानंतर होळकर यांजकडील फवजा बहुत देशीं घांट चढून आल्या. यामुळें बहुत चिंता लागली आहे. कांठीपिंपळगांवावर पठाण यांची फवज आली, ह्मणोन वर्तमान ऐकतों. त्यास, येविशींची बातमी आपल्यास पक्केंपणें असेल. त्यास पठाण कोठें आला आहे, पुढें कोण्हीकडे जाणार, खंडण्या घेतात, किंवा लूटलबाडी करितात, हें सविस्तर वर्तमान लिहून पा व खासा होळकर यांचे लष्करची बातमी असल्यास तेही ल्याहावी, बहुत काय लिहिणें लाभ करावा हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries