मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक ५७२

श्री.
१७२४ वैशाख

श्रीमद्वेदशास्त्रसंपन्न राजमान्य राजश्री नानाजी दीक्षित स्वामीचे सेवेसी:-

विद्यार्थि गणेश शिवराम साष्टांग नमस्कार विज्ञापना. येथें आज वर्तमान दाट ऐकण्यांत आहे कीं, यशवंतराव होळकर यांची धुळ्यावर खासा स्वारी आली त्याजवरून आपणास लिालें आहे. तरी मालेगांवीं आपला गडी गेला तो कालच यावासा आपलें लिहिण्यांत काल होतें. त्यास, माणूस आलें असल्यास, तेथील काय पत्र आलें असेल, तें पाठवावें. अथवा मालेगांवचें माणूस आलें नसल्यास, आज आलियावर सविस्तर कळविण्यास आज्ञा असावी. येथें आज वर्तमान ऐकतों, येविशींचे आपलें ऐकण्यांत कसें आहे, तेंहि लिा लें पाहिजे, सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries