Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक ५७५

श्री.
१७१४ वैशाख.

विशेष. आपण स्वारीसुद्धां खानदेशांत आला. पुढें या प्रांतीं फौजसुद्धा येणार हें वर्तमान ऐकिल्यावर बहुत संतोष जाहला. राजश्री फत्तेसिंगराव माने वगैरे फौजासुद्धां पुढें याप्रांतीं रवानगी जाली. जनवार्ता जे, उपद्रव आहे याजमुळें तिरस्थळी क्षेत्रस्थ ब्राह्मण भयभीत जाले. परंतु सर्वांचे मनांत कल्पना आली जे, मुख्य ठिकाणाहून क्षेत्रास उपसर्ग होऊं नये, अशी ताकीद असेल, असें जाणून माने यांजकडे तिरस्थळी क्षेत्रस्थ ब्राह्मण श्रीफळ घेऊन गेले. तेथें गेल्यानंतर ब्राह्मणांचा सन्मान करून आपलें नांवें सर्व ब्राह्मणांस अभय पत्र दिल्हें जे, स्वस्थपणें स्नानसंध्यां करून राज्याचें अभीष्टचिंतन करून असावें. त्याजवरून परम समाधान जालें. आणि लौकिकांत ऐकिल्यांत आहे जे, ब्राह्मणांविषयीं बहुत ताकीद भक्तिपुरःसर आहे. त्याप्रो अनुभवहि दृष्टोत्पत्तीस आला. पूर्वापार आपले सरदारींत व संस्थानाविषयीं आस्थाच आहे. तेणेंकरून ईश्वरें सर्वोपरीं फत्तेच केलीं. प्रस्तुत, आपणाकडील फौजाचीहि वर्तणूक पूर्वसांप्रदायानुरूप होईल. येथील संस्थानाकडे पा गांडापूर माहालचे मौजे कायगांव व कांठेपिंपळगांव व जोगळें पो। नेवासें असें गांव आहेत. त्यास, पागेपथके यांचा उपसर्ग हरएकविशीं न व्हावा, येविशीं ताकीद आहेच. परंतु याअन्वयें ताकीदपत्र असावें. या तिरस्थळीस, शिंदे या प्रांती होते तों पावेतों, बहुत छळणा जाली. हालीं मीरखान पठाण वारीसिंगचे येथें आले. येथें गंगा उतरावयासीं येणार, ऐसें ऐकितों. त्याजवरून तिरस्थळी बहुत भयभीत जाली. त्यास या क्षेत्राविषयीं मीरखां यांस निक्षुन ताकीदपत्र * असावें.