मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक ५६९

पौ जेष्ठ वद्य १३
श्री

१७२४ वैशाख वद्य ११

हकायेक व नारफ अगाह नाना दीक्षित सलामतः-

अजतरक शाहमादखां बहावर बाद बंदगी आंकी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत गेलें पाहिजे. विशेष. आपण फौजेचे दहशतीकरिता हावलदिल जालांत, म्हणोन राजश्री नारो बल्लाळ यांनीं सांगितलें. त्याजवरून आपणास पत्र लिहिलें असे. तर, आपण फौजेचा वसवास चित्तांत न आनितां खातरजमा राखोन मौजे कायगांवी स्थिता करावी. आपणाकडेस कांहीं उपसर्ग लागणार नाहीं, बहुत काय लि। ? रा छ २४ मोहरम हे किताबत. *

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries