मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक ५६८

श्री
१७२४ वैशाख वद्य ११

( फारशी शिक्षा आहे. )

ता। मो। मौजे कायेगांव प्रो। गांडापूर. सुा इसन्ने मयातैन व अलफ. तुह्मी फौजेचे दहशतीकरितां हवालदील जालांत, म्हणोन राजश्री नारो बल्लाळ यांनीं हुजूर विदित केलें. त्याजवरून कौल सादर केला असे तर, तुह्मीं खातरजमा राखोन मौजे मजकुरीं आबाद राहणें. फौजेचा उपसर्ग तुह्मांकडे कांहीं लागणार नाहीं. रा छ २४ मोहरम, मोर्तबसूद.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries